Bihar Crime news Father of JDU Leader Beaten to Death Saam tv
देश विदेश

धक्कादायक! बड्या नेत्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला, जागीच दुर्देवी मृत्यू, नेमकं घडलं काय?

Elderly Man Brutally Killed by Mob: जेडीयू नेते भैरव प्रसाद मंडल यांचे वडील छेदी मंडल यांच्यावर प्राणघातक हल्ला. जमिनीवर कोसळले जागीच मृत्यू. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.

Bhagyashree Kamble

बिहारमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जेडीयू नेत्याच्या वडिलांची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बांका जिल्ह्यातील बौंसीच्या गदाल गावात काही आरोपींनी वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मृत वृद्ध व्यक्तीचे नाव छेदी मंडल (वय वर्ष ६८) असे असून, ते बौंसी ब्लॉक जेडीयू अध्यक्ष भैरव प्रसाद मंडल यांचे वडील होते.

ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणाबाबत कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, छेदी मंडल हे सायंकाळी घरी बसले होते. यादरम्यान, अंगारू गावातील देव कुमार झा आणि जाबा गावातील सचिन कुमार चौधरी हे सुमारे १५ ते २० जणांसह गावात आले. त्यांनी सर्वात आधी भैरव प्रसाद मंडल यांचा मुलगा सौरभ याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

नातवाला मारहाण होत असल्याचं पाहून सौरभचे आजोबा छेदी मंडल यांनी विरोध केला. आरोपींनी छेदी मंडल यांच्यावर हल्ला चढवला. तसेच मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, छेदी मंडल बेशुद्ध पडले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने बौंसी रेफरल रूग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणाबाबत भैरव प्रसाद मंडल यांनी सांगितले की, 'एका महिन्यापूर्वी सौरभ इंटरमिडिएटचे शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेला होता. तिथे आरोपींशी त्याची ओळख झाली. काही कारणास्तव त्याचे आरोपींसोबत भांडण झाले. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी साथीदारांसोबत वडिलांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली', असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT