देश विदेश

Crime News : भजन ऐकायला निघाली, वाटेत अडवलं अन् मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार

Bihar Crime News: कटिहारच्या प्राणपूरमध्ये भजनाला जात असताना एका मूक अल्पवयीन मुलीचे दोन तरुणांनी अपहरण करून बलात्कार केला. हातवाऱ्यांतून तिने पालकांना अत्याचाराची माहिती दिली.

Dhanshri Shintre

  • प्राणपूर ब्लॉक, कटिहारमध्ये मूक अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.

  • भजनाला जात असताना आरोपींनी तिला जबरदस्तीने नेले.

  • पीडितेने पालकांना हातवाऱ्यांतून कहाणी सांगितली.

  • पोलिसांनी आरोपींना अटक करून फॉरेन्सिक तपासणी सुरु केली आहे.

बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील प्राणपूर ब्लॉकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशना पोलीस स्टेशन परिसरात एका मूक अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलगी घराजवळ आयोजित करण्यात आलेल्या भजन-कीर्तन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना आरोपींनी तिला जबरदस्तीने रोखले. दोघांनी तिला दुचाकीवरून एका निर्जन भागात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दरम्यान पीडितेचे पालक मुलीचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले. पालकांना पाहून पीडिता रडू लागली. त्यांना मिठी मारली आणि हातवाऱ्यांतून आपल्यावर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केले.

आपल्या मुलीसोबत घडलेले पाहून कुटुंबीय हादरले आणि तत्काळ रोशना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीनंतर तातडीने शोधमोहीम राबवली गेली. पोलीस प्रमुख मासूम कुमारी यांनी सांगितले की, मुलीच्या चिन्हांनुसार आणि तक्रारीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे.

याशिवाय घटनास्थळाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक (FSL) टीम देखील पाठवण्यात आली आहे. या गुन्ह्याने केवळ एका निरागस मुलीचे आयुष्य हादरवले नाही, तर समाजात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला अधोरेखित केले आहे. स्थानिक लोकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवरात्रीपासून नवीन जीएसटी दर लागू होणार- PM मोदी

Weight Loss Tips: थुलथुलीत पोट होईल सपाट, फक्त दुपारच्या आधी ४ गोष्टी करा, दिसाल फिट

फडणवीसांमध्ये पंतप्रधान होण्याचे गुण, पण...; काँग्रेसच्या नेत्याच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

नवरा OYOमध्ये प्रेयसीच्या मिठीत, बायकोनं रंगेहाथ पकडलं, प्रेयसीच्या झिंज्या उपटून बेदम चोपलं

Maharashtra Politics : ३ कोटी खर्च, १०० बोकडं अन्... शिंदे गटाच्या आमदाराने सांगितला आगामी निवडणुकीचा प्लान

SCROLL FOR NEXT