SUPAUL MURDER SHOPKEEPER SHOT DEAD OVER CIGARETTE DISPUTE IN BIHAR Saam Tv
देश विदेश

Crime News: सिगारेट न दिल्यामुळे तरूणाला राग अनावर, दुकानदाराची गोळ्या घालून हत्या

Bihar Crime News: सुपौलमधील बॅरो चौकात किरकोळ कारणावरून एका पान दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिगारेट उधारीवर देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून हा खून झाला असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Dhanshri Shintre

  • सिगारेट उधारीवर देण्यास नकार दिल्यामुळे सुपौल येथे दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या झाली.

  • आरोपी आदित्य यादव हा स्थानिक पीएसीएस अध्यक्ष शंभू यादव यांचा मुलगा आहे.

  • पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त करून तपास सुरू केला आहे.

  • हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी आंदोलन केले.

बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील बॅरो चौक भागात शुक्रवार संध्याकाळी घडलेल्या एका चकित करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. उधारीवर सिगारेट न दिल्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाने पान दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत दुकानदाराचे नाव साजन कुमार (वय २५) असे असून, आरोपीची ओळख आदित्य यादव अशी झाली आहे. जो स्थानिक पीएसीएस अध्यक्ष शंभू यादव यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची वेळ सायंकाळी सुमारे ६:१५ ची होती. आदित्य यादव दुचाकीवर येऊन बॅरो चौकातील साजन कुमार यांच्या पान गुटखा दुकानात गेला. त्याने सिगारेट मागितली. परंतु साजन यांनी त्याचे पैसे बाकी असल्याचे कारण देऊन उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला. या किरकोळ विषयावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रागात भरलेल्या आदित्यने पिस्तूल काढून थेट साजनवर चार गोळ्या झाडल्या आणि दुचाकी सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

तीन गोळ्या साजन यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी त्यांच्या अंगठ्याला लागली. रक्तबंबाळ झालेल्या साजनला तेथील लोकांनी तातडीने सदर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची बातमी पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी बॅरो चौकात कर्णपूर-नवहट्टा रोड अडवून आंदोलन केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सुपौल पोलिस अधीक्षक शरथ आर.एस. यांनी सांगितले की, सिगारेटवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त केली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. त्यांनी सांगितले की, आरोपीला लवकरच अटक केली जाईल आणि या जघन्य गुन्ह्याला शिक्षा मिळेल.

दरम्यान, मृत साजन कुमार यांच्या घरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली असून संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकून तेथील वातावरण शोकाकुल बनले आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर अशा कारणावरून झालेल्या हत्येने स्थानिक नागरिकांना हादरवून सोडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, राज्य सरकारचा आणखी एक धडाडीचा निर्णय

Maharashtra Live News Update : - लाखो भाविकांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांचा ८३वा वाढदिवस, चाहत्यांचा मोठा उत्साह|VIDEO

Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

CM फडणवीसांनी काल 'आदेश' दिला; आज पोलिसांनी भाजप नेत्यालाच उचललं!

SCROLL FOR NEXT