Bihar Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : भाच्याची गर्लफ्रेंड प्रेमात, अनैतिक संबंध अन् हत्येची सुपारी; मामाच्या भयंकर कृत्याने शहरात खळबळ

Bihar Crime News : बिहारमध्ये मामाने भाच्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने केली हत्या. आरोपी मामासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्यामध्ये मामाने भाच्याची सुपारी देऊन हत्या केली

  • प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने सुपारी दिली

  • आरोपी मामासह ४ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक.

  • पोलिसांचा तपास सुरु

बिहारमधून धक्कादायक घटना घडली आहे. सख्ख्या मामाने भाच्याची सुपारी देऊन त्याची हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मामाचे अनैतिक संबंध भाच्याला समजले आणि त्याचं भीतीतून पीडित मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथील मस्कन बरारी येथे राहणाऱ्या कहलगाव येथे घडली आहे. मृत मुलाचे नाव अभिषेक असून त्याच्या मामाचे नाव संतोष असे आहे. संतोष हा विवाहित असून त्याचे २ मुलींसोबत अनैतिक संबंध होते. या दोघींपैकी एका मुलीचे अभिषेकशी अनैतिक संबंध होते.

अभिषेकला त्याच्या मामाच्या प्रेमसंबंधांविषयी आधीच समजले होते. त्याने मामला याबाबत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मात्र संतापलेल्या संतोषने अभिषेकचा काटा काढायचे ठरवले. मात्र स्वतःचे हात खुनाने न माखवता अभिषेकला मारण्यासाठी संतोषने काही गुंडांना अभिषेकची सुपारी दिली. यानंतर ४ गुंडांनी मिळून अभिषेकवर हल्ला केला. करवत, ब्लेड, चाकू यांचा वापर करून अभिषेकची हत्या करण्यात आली. त्याचे सगळे अवयव धडापासून वेगळे करण्यात आले.

हत्येनंतर रक्त दूरवर वाहू नये म्हणून त्यांनी अभिषेकच्या मानेखाली आणि पायांमध्ये प्लास्टिक शीट ठेवली आणि घटनास्थळावरुन पसार झाले. दरम्यान अभिषेक घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार केली असता पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासादरम्यान अभिषेकच्या हत्येमागे त्याचा मामा असल्याचे उघडं झाले. याप्रकरणात संतोषला अटक करण्यात आली असून त्याच्या सोबत ४ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेकच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

Chanakya Niti: तुमच्याही आजूबाजूला टॉक्सिक लोक खूप आहेत? कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितल्या 5 सिक्रेट टिप्स

Mumbai-Pune : मुंबई-पुण्याजवळ कॅम्पिंगसाठी खूपच सुंदर लोकेशन, पाहा नेमकं कसं जायचं?

Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

उमेदवारीवरून मातोश्रीबाहेर महिलांचा गराडा; हालीम शेख यांच्या उमेदवारीला विरोध|VIDEO

SCROLL FOR NEXT