Bihar Patana Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Bihar Patana Crime News : बिहारच्या पटणामध्ये ‘ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली गरोदर केल्यावर पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पटणामध्ये ‘प्रेग्नन्सी जॉब’च्या नावाखाली सायबर फसवणूक

  • मुलं नसलेल्या जोडप्यांच्या संवेदनशीलतेचा गैरफायदा

  • नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे उकळले

  • पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली

बिहारच्या पटणामध्ये स्त्रियांना गरोदर केल्यावर १० लाख मिळणार अशा आशयाने फसवणूक करण्यात आली आहे. या नव्या सायबर फसवणुकीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी ज्यांना मुल होत नाही, अशा जोडप्यांच्या संवेदनशीलता आणि गरजांना लक्ष्य केले आणि "ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस" नावाखाली मोठा घोटाळा केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पटणामध्ये "ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस" नावाखाली मोठा घोटाळा सुरु होता. सुरुवातीला या घोटाळ्यात ज्यांना मुल होत नाही, अशा जोडप्यांच्या संवेदनशीलता आणि गरजांना लक्ष्य केले गेले. त्यानुसार ज्या महिलांना मुलं नाही अशा ,मुलांना फोन त्यांच्या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. शिवाय महिलांना कशा पद्धतीने गरदोदर केले जाते याबाबत काही जणांना विचारपूस केली.

शिवाय जर त्यांनी मुल नसलेल्या महिलांना गर्भवती केलं तर त्यांना मोठं बक्षीस मिळेल असं आश्वासनही दिलं. या फसवणुकीला बळी पडून अनेकांनी नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसेही जमा केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने विशेषतः अशा लोकांना लक्ष्य केले जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते किंवा लवकर पैसे कमविण्याचे स्वप्न पाहत होते. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक अभिनव धीमान यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत मनवा गावातील एका घरावर छापा टाकला. जिथे दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलं. अटक केलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. आरोपींनी चौकशी दरम्यान फसवणूक केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक- CM फडणवीस

Styling Tips: महागडे कपडे न घालताही दिसाल एकदम क्लासी! लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ स्टाइलिंग टिप्स

Dangerous Fort : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Maharashtra News Live Update: सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

Snake Bite: सापाचे विष किती प्रकारचे असते, शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT