Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल

Diva-Sawantwadi Kokan Railway News : कोकण मार्गावरील दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. १२ जानेवारीपासून या ट्रेनच्या वेळेत बदल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल
Diva-Sawantwadi Kokan Railway NewsSaam Tv
Published On
Summary
  • दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल

  • १२ जानेवारीपासून लागू होणार बदल

  • रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळ पाहून नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन

कोकणवासियांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल लागू करण्यात येणार आहेत. येत्या १२ तारखेपासून हा बदल लागू करण्यात येणार आहेत. या सुधारित वेळापत्रकामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

दिवा–सावंतवाडी रेल्वेच्या वेळापत्रकात येत्या १२ जानेवारी पासून महत्त्वाचे बदल लागू करण्यात येणार आहेत. नव्यावर्षात आता सुधारित वेळापत्रकानुसार दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस ही १० ते १५ मिनिटे आधी म्हणजेच सकाळी ६ ते ६.१५ दरम्यान दिवा स्थानकातून सुटणार आहे. याशिवाय या एक्सप्रेसच्या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल
Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

पनवेल, रोहा, चिपळून, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर ही गाडी आता वेळेच्या १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणार आहे. तर सावंतवाडीवरून दिव्याच्या परतीच्या प्रवासाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडीही आता पूर्वीपेक्षा १० ते १५ मिनिटे आधी धावणार असून, यामुळे परतीच्या प्रवासातही वेळेची बचत होणार आहे.

Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल
Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

या बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक १२ जानेवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com