Bihar CM Samrat Choudhary’s helicopter seen hovering mid-air for several minutes in Hajipur, raising concerns among officials and locals. saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Bihar CM Helicopter Hovered For 4 Minutes In Hajipur: हाजीपूर येथे बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाणानंतर सुमारे ४ मिनिटे हवेत घिरट्या घातल्याने खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री विजय चौधरी देखील सोबत होते. रूट क्लिअरन्सच्या विलंबामुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

बिहारमधील हाजीपूर येथे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री विजय चौधरी पेपरलेस नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी दाखल झाले. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि उद्घाटनानंतर परत जाण्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, उड्डाण घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर सुमारे 150 फुट उंचीवर गेले. मात्र पुढे जाण्याऐवजी ते जवळपास चार मिनिटे एकाच ठिकाणी हवेत घिरट्या घालत राहिले. या दरम्यान हेलिकॉप्टरने दिशा देखील बदलली आणि काहीवेळ ते हेलीपॅडकडे परत येत असल्याचे दिसून आले.

हेलिकॉप्टर बराच वेळ एकाच ठिकाणी राहिल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांसाठी हेलिकॉप्टर पुन्हा उतरणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली, मात्र तसे झाले नाही. सुमारे चार मिनिटांनंतर हेलिकॉप्टरने पुन्हा स्थिर उड्डाण घेतले आणि हाजीपूरहून रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर काही काळ हवेत घिरट्या घालत राहण्यामागचे कारण म्हणजे रूट क्लिअरन्सची पुष्टी न होणे असे सांगितले जात आहे. मार्ग मोकळा झाल्यानंतरच पुढील उड्डाण सुरू करण्यात आले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर सम्राट चौधरी यांचा हा हाजीपूरमधील पहिलाच दौरा होता. त्यांच्या आगमनावेळी एनडीएचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत फुलांच्या हारांनी त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री यांनी जिल्हा नोंदणी कार्यालयात पेपरलेस नोंदणी प्रणालीसह विविध नवीन उपक्रमांची सुरुवात केली. या उपक्रमांचा उद्देश नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.

या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देत, त्यामुळे नागरिकांना अधिक पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळतील, असे नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT