BIHAR MUZAFFARPUR ACCIDENT: TWO WOMEN KILLED AFTER FORTUNER ALLEGEDLY HITS SCOOTER, BJP LEADER'S VEHICLE UNDER SCANNER Saam Tv
देश विदेश

Accident : भीषण अपघात! भाजप नेत्याच्या भरधाव कारची स्कुटीला धडक, २ तरुणींचा जागीच मृत्यू

Bihar Accident News : बिहारमध्ये भरधाव फॉर्च्युनरने स्कूटरला धडक दिल्याने दोन २३ वर्षीय तरुणींचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहन भाजप नेता नूतन गुप्ता यांच्या नावावर असल्याचा दावा असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये फॉर्च्युनर आणि स्कूटरचा भीषण अपघात

  • या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू

  • अपघातग्रस्त फॉर्च्युनर भाजप नेत्याच्या नावावर

बिहारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्याच्या कारची स्कुटीवरून येणाऱ्या दोन तरुणींना जोरदार धडक बसली. या धडकेत तरुणींचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात बोचहान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिगोपालपूर चौकाजवळ शनिवारी हा अपघात घडला आहे. पोलीस तपासात ज्या करणे तरुणींना धडक दिली ती कार भाजप नेते नूतन गुप्ता यांची असल्याचे उघडकीस आले. या अपघाताने खळबळ उडाली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणी स्कूटरवरून प्रवास करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कूटरचा चुराडा झाला, तर फॉर्च्युनरही नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये जाऊन पडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

मृत तरुणींची ओळख नेहा कुमारी (वय २३) आणि निशू कुमारी (वय २३) अशी झाली आहे. नेहा ही आदिगोपालपूर येथील रहिवासी राजू चौधरी यांची मुलगी होती, तर निशू ही सरफुद्दीनपूर येथील सोहन चौधरी यांची मुलगी होती. अपघातानंतर त्यांना तातडीने एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अपघातग्रस्त गाडी पूर्णिया येथील भाजप नेत्या नूतन गुप्ता यांच्या नावावर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अपघाताच्या वेळी गाडीत नेमके कोण होते, वाहन कोण चालवत होते आणि अपघातानंतर ते कुठे गेले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडीत कोणीही आढळले नाही. त्यानंतर क्रेनच्या मदतीने झुडपात अडकलेली फॉर्च्युनर बाहेर काढण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपासणी करत आहेत. या घटनेमुळे मृत तरुणींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या रसायनी येथे ST बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका

SIP Calculator: फक्त ६००० च्या SIP मधून रिटायरमेंटनंतर महिन्याला ६ लाखांची कमाई? जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

Akanksha Chamola: 'मी बायसेक्शुअल होते, मुलींसोबत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पावसाळ्यात डोकं ठणकत असेल तर घरीच करा सोपा उपाय, अवघ्या १० मिनिटांत मिळेल आराम

Vande Bharat : मुंबई अहमदाबाद प्रवास फक्त १ तासात, २०२७ ला सुरु होणार पहिला टप्पा; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT