MAITHILI THAKUR VIRAL AUDIO CONTROVERSY: BJP MLA FACES CRITICISM OVER ALLEGED PHONE CALL WITH YOUTH Saam Tv
देश विदेश

Political News : भाजपा महिला आमदार वादाच्या भोवऱ्यात, तरुणाला अपमानास्पद शब्दांत झापलं, ऑडिओ व्हायरल

Bihar Political News : बिहारमधील अलीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचा एक कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेपत्ता युवकाच्या प्रकरणावरून झालेल्या या वादामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचा एक कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • बेपत्ता युवकाच्या कुटुंबीयांना भेट न दिल्याचा आरोप आमदारांवर करण्यात आला

  • कथित ऑडिओमध्ये आमदारांनी तरुणाशी अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा दावा

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर या एका नव्या वादामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्यांनी एका तरुणाशी बोलताना रागारागामध्ये अपमानास्पद शब्द वापरल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपमुळे मैथिली ठाकूर अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, अलीनगर मतदारसंघातील नदियामी गावातील गौतम झा राहत असलेल्या गावातील सुभाष चौपाल हा तरुण काही दिवसांपूर्वी हैदराबादहून आपल्या गावी परतण्यासाठी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचला नाही आणि बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान, आमदार मैथिली ठाकूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी इतर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु बेपत्ता युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही, असा आरोप करण्यात आला.

गौतम झा याने पीडित कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये कुटुंबीयांनी आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आमदार मैथिली ठाकूर यांनी रागारागात ४ जुलै रात्री सुमारे ११ वाजता तरुणाला फोन केल्याचे सांगितले जात आहे. फोनवर त्यांनी संतापून गौतम झा यांची अक्कल काढल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित तरुण या गावात राहायच्या लायकीचा नसून तो या परिसरासाठी कलंक असल्याचं मैथिली ठाकूर यांनी कॉलवर म्हटले.

गौतम झा ने माध्यमांशी संवाद साधताना हा ऑडिओ खरा असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याने म्हटले की मी आमदार मैथिली ठाकूर यांच्याशी बोलताना कोणतेही चुकीचे शब्द वापरलेले नाहीत. सध्या हा कथित ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणावर आमदार मैथिली ठाकूर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'ही' 3 महत्त्वाची कामे आजचा करा; अन्यथा, पीएम किसानचा 24 वा हप्ता विसरा

Jana Nayagan: विजय थलापती यांच्या 'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार

Korean Skin Care Tips : घरगुती उपायांनी मिळवा कोरियन ग्लास स्किन; जाणून घ्या सोपी स्किनकेअर रूटीन

Mahabharata curses: महाभारतातील असे ७ शाप ज्यामुळे संपूर्ण युद्धाची दिशा बदलली होती, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT