Bihar Accident News  Saam Tv News
देश विदेश

मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कारने आधी संरक्षण भिंत तोडली, पुलावरून थेट खड्ड्यात पडली, तिघांचा मृत्यू

High-Speed Car Accident: बिहारच्या नालंदामध्ये भीषण रस्ता अपघात. भरधाव कार २० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली. तिघांचा मृत्यू, एक तरुण गंभीर जखमी.

Bhagyashree Kamble

  • बिहारच्या नालंदामध्ये भीषण रस्ता अपघात

  • भरधाव कार २० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली

  • तिघांचा मृत्यू, एक तरुण गंभीर जखमी

  • पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा बिहटा-सर्मेरा मुख्य रस्त्यावरील भेंडा वळणाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरील बॅरिकेड तोडून थेट २० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली.

या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा भीषण रस्ता अपघात बिहटा सरमेरा मुख्य रस्त्यावर घडला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या मते, कारचे वेग सुमारे १०० किमी होते. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. सकाळी अपघाताचं प्रकरण उघडकीस आलं. स्थानिक नागरिकांना रविवारी सकाळी पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात कार दिसली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

गावकऱ्यांना तीन मृतदेहही पाण्यात तरंगताना दिसले. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी इतर गावकऱ्यांना बोलावून घेतलं. तसेच मृतदेह बाहेर काढले. गावकऱ्यांनी थेट पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार बाहेर काढली. तसेच जखमी तरूणांनाही बाहेर काढले आणि खासगी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

तर, एक तरूण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यानंतर तरूणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच यातून मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? कारचं नियंत्रण कसं सुटलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : गोव्याहून सुंदर ठाण्यातील 'हा' समुद्रकिनारा, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांचे संगमनेरात जल्लोष स्वागत...

Monday Horoscope : स्पर्धात्मक वातावरणात प्रगती होईल, ५ राशींना मिळेल यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT