Bihar Political News Saam tv
देश विदेश

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Bihar Political News : बिहारमध्ये मतदानाच्या आदिल्या दिवशीच मोठा गेम झाला आहे. 'जन सुराज'च्या नेत्याने उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय ट्विस्ट

जन सुराज पक्षाचा उमेदवार संजय सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश, उमेदवारी देखील सोडली

मुंगेर मतदारसंघातील भाजप उमेदवार कुमार प्रणय यांना बळकटी

या घडामोडीमुळे प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मोठा धक्का

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी काही तास उरले आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या काही तास आधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंगेर विधानसभा मतदारसंघातून 'जन सुराज' पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जन सुराजच्या उमेदवाराने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलंय. या मतदारसंघाची संपूर्ण बिहारमध्ये चर्चा होत आहे.

मतदानाच्या एक दिवस आधीच मुंगेर विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट निर्माण झाला आहे. जन सुराज पक्षाने या मतदारसंघात संजय सिंह यांना उमेदवारी दिली होती. परंतु संजय सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपने या मतदारसंघात कुमार प्रणय यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या या खेळीने मतदारसंघातील वातावरण फिरलं आहे. भाजपच्या खेळीमुळे प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मोठा फटका बसला आहे.

मुंगेर विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेवदार कुमार प्रणय हे त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. कुमार प्रणय यांच्याकडे जवळपास १७७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावाचा समावेश बिहारमधील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत झाला आहे.

२०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला होता. भाजप उमेदवार प्रणव कुमार यादव यांचा अतितटीच्या लढाईत विजय झाला होता. तर २०१५ साली झालेल्या निवडणुकीत आरजेडीच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

Vasai-Virar Tourism : स्वच्छ वाळू अन् हिरवेगार वातावरण, 'हा' आहे वसईजवळील शांत समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT