Cylinder Price Hike Saam Tv
देश विदेश

LPG Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, नवीन दर तपासा

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका

Shivani Tichkule

Gas Cylinder Price Hike : आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.

दरवाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1769 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1721 रुपये झाली आहे. कोलकाताबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1870 रुपये आणि चेन्नईत ही किंमत 1917 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी गॅस व्यावसायिक सिलिंडर 153.5 रुपयांनी महागला होता

घरगुती सिलिंडरच्याबाबतीत बोलायचं झालं तर, देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. शेवटचा बदल हा 6 जुलै 2022 रोजी करण्यात आला होता, इंधन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती.

गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 153.5 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये घरगुती एलपीजीच्या किंमतीत चार वेळा बदल झाला आहे. यावेळीही महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नसली तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT