Koregaon Bhima : आज शौर्य दिवस, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

आज 205 वा शौर्य दिवस साजरा करण्यात येत आहे.
Koregaon Bhima
Koregaon BhimaSaam Tv
Published On

पुणे - आज 205 वा शौर्य दिवस साजरा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्तविजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये येथे दाखल झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

Koregaon Bhima
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार; काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे दंगलही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचा मोठा फौज आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. निर्बंधमुक्त महाराष्ट्र असल्याने दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात लोकं बाहेर पडत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

50 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यातून पोलीस लक्ष ठेवत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून जयस्तंभ परिसरात 7 पोलीस अधीक्षक 18 पोलीस उपाधिक्षक, 60 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक 2500 अंमलदार आणि 4 SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Koregaon Bhima
Bank Holidays : 2023 मध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत बँक किती दिवस बंद राहणार? वाचा संपूर्ण यादी

भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई

कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी 1818  रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती.

ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीचे कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या केवळ 500 सैनिकांनी 28000 पेशवा सैन्याचा पराभव केला. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ उभारण्यात आले. त्यामुळे दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com