Eknath Shinde vs Uddhav Thackeray Thackeray Saam TV
देश विदेश

Supreme Court: ठाकरे गटाला मोठा दिलासा, पक्षाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Supreme Court On Shivsena Property News: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाकडेच ही संपत्ती राहणार आहे.

Priya More

Delhi News: शिवसेनेमध्ये (Shinde) फूट पडल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारला (Thackeray Government) पाय उतार व्हावे लागले होते. यामुळे शिसेनेचे ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले होते.

त्यानंतर ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) याचिकाकर्त्याला देखील खडेबोल सुनावले आहेत. (Maharashtra Breaking News)

वकील आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी आशिष गिरी यांना फटकारले. संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण?, असा सवाल करत सुप्रीम कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाकडेच ही संपत्ती राहणार आहे. (Breaking Marathi News)

आशिष गिरी यांनी 10 एप्रिल 2023 ला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आशिष गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी अशी मागणी केली होती. या याचिकेत त्यांनी असे म्हटले होते की, 'एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते झाले आहेत. त्यामुळे शिवसेना भवनासह पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा. तसंच, निकाल लागेपर्यंत ठाकरे गटाला पक्षाचा निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा.' (Political News)

आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आशिष गिरी यांना चांगलेच फटकारले. 'ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली. महत्वाचे म्हणजे, शिंदे गटाने आधीच शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी देखील आशिष गिरी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नाही. आता ही याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT