Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: मोठी बातमी! राहुल गांधींविरोधात गुन्हा, 'त्या' वक्तव्यानंतर पोलिसांची कारवाई

Case Register Against Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ

  • उत्तराखंडच्या हल्द्वानी पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

  • राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात अमित कुमार यांची पोलिसांत तक्रार

  • अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा राहुल गांधींवर आरोप

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलिस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्यावर अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमित कुमार नावाच्या एका तरुणाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हल्द्वानी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNSS) कलम 196 आणि 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला. राहुल गांधी यांच्याविरोधातील गुन्ह्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या कलम 3(1) चा देखील समावेश करण्यात आला आहे. हे प्रकरण हल्द्वानी येथील काँग्रेसच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरण विधीशी आणि त्या विधीसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याशी संबंधित आहे. राहुल गांधींनी हा विधी दलितविरोधी असल्याचे सांगून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्याने आरोप केला आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ८ ऑगस्ट रोजी हल्द्वानीमध्ये काँग्रेसची रॅली झाली होती. या रॅलीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हजेरी लावली होती. या रॅलीनंतर एका हिंदू संघटनेने रामलीला मैदानावर शुद्धीकरण विधी केला. आयोजकांनी दावा केला की, रामलीला मैदानातील घाण आणि कथित जातीयवादी घोषणांचा निषेध करण्यासाठी हे शुद्धीकरण करण्यात आले. पण काँग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दलित अस्मितेशी याचा संबंध जोडून या शुद्धीकरणाला विरोध केला.

या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधींनीही या शुद्धीकरण विधीला दलितविरोधी ठरवत त्यावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर हल्द्वानी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार अमित कुमार यांनी राहुल गांधींवर अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आणि कारवाईची मागणी केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करत तसाप सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT