पुण्यात डीजेवरून राजकारण तापलं; DJ मुक्त पुण्याला गणेश मंडळांचाच विरोध

DJ Ban Sparks Controversy in Pune Ahead of Ganeshotsav: डीजेवरून पुण्यात सुरु झालेल्या वादाची....डीजेमुक्त पुण्याला एकीकडे पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना आता काही गणेशभक्तांनी याविरोधाक आक्रमक पवित्रा घेतलाय... लवकरच डीजेवरून समर्थक आणि विरोधक आंदोलन पुकारणार आहे... नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...
Pune Ganeshotsav DJ Controversy: DJ Ban Sparks Protest Debate
Pune Ganeshotsav DJ Controversy: DJ Ban Sparks Protest Debatesaam tv
Published On

येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजेवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापलयं.... ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टमविरोधात बंदीचा निर्णय घेतल्यानं ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे गणेश मंडळांनी पोलीसांच्या निर्बंधांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय....पोलीसांनी गणेशोत्सवात नेमकं कोणत्या साऊंड सिस्टमवर बंदी घातलीय..ऐका...

एकीकडे पोलिसांनी पुण्यात कर्णकर्कश डीजे साऊंड आणि प्लाझ्मा-प्रेशर मिडच्या वापरावर निर्बंध घातलेले असताना दुसरीकडे पुणेकरांना डीजेविरोधात एकत्र येण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येतयं...

डीजेविरोधात पुणेकरांचं सोशल कॅम्पेनिंग

गणेशोत्सवात डीजे आणि मोठ्या आवाजाच्या डॉल्बी सिस्टीममुळे होणाऱ्या त्रासाविरोधात पुणेकर 30 ऑगस्टला रस्त्यावर उतरणार

ध्वनी प्रदूषणावर कडक नियमांची अंमलबजावणी करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी

30 ऑगस्टला सकाळी 10.30 ते 11.30 आंदोलन होणार

अभिनव चौक ते डेक्कन येथील गुडलक चौकापर्यंत डीजेविरोधात मोर्चा

दुसरीकडे डीजेच्या समर्थनार्थ निर्बंधमुक्त गणेशोत्सव हवा अशी मागणी केली जातेय.त्यामुळे डीजेवरून विरोधक आणि समर्थक आमनेसामने आलेत...दरम्यान गणेशोत्सवातील चुकीच्या प्रथा बंद व्हायला हव्यात...मात्र बदल स्विकारायला वेळ द्यावा लागेल असं मत आमदार हेमंत रासनेंनी व्यक्त केलयं...मात्र गणेशोत्सवातच निर्बंध का असा सवाल काही पुणेकरांनी उपस्थित केलाय..

पुण्याच्या गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. काळानुरूप उत्सवाच्या स्वरूपात बदल झाला असला, तरी सध्या डीजे, प्लाझ्मा लेझर आणि प्रेशर मिड आवाजाबाबत समाजात दोन वेगवेगळे विचारप्रवाह स्पष्टपणे दिसून येत आहेत. एका बाजूला धार्मिक आणि शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्याची मागणी होतेय, तर दुसऱ्या बाजूला मंडळांना मात्र कुठलेच निर्बंध नको आहेत..खर तर सोलापूर शहरात डीजेबंदी घालून एक नवा पायंडा घातला गेला आहे. पुण्यातला गणेशोत्सव याच मार्गाने जाणार की डीजेवरून पुण्यात आंदोलन पेटणार.. हे पाहणं महत्त्वाचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com