Maldives India Relations Saam Tv
देश विदेश

Maldives India Relations : मालदीवच्या नवीन अध्यक्षांनी शपथ घेताच दाखवले रंग, भारतीय सैन्याला मायदेशी परतण्यास सांगितले

Satish Kengar

Maldives India Relations :

मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडताना दिसत आहेत. यातच मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत सातत्याने बोलत आहेत. यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) राष्ट्रपती कार्यालयात भारत सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान औपचारिकपणे ही विनंती केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू मालदीवच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांची मुइज्जूशी भेट झाली होती. (Latest Marathi News)

यानंतर मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाइटवर एक प्रेस रिलीज अपलोड करण्यात आली. यापूर्वी त्यात फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या, ज्यात मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतण्याची विनंती करण्यात आली. नंतर ते काढून टाकण्यात आले आणि एक मोठी प्रेस रिलीझ अपलोड करण्यात आली.

यामध्ये भारतीय जवानांचाही उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, "मुइज्जू यांनी भारत सरकारला मालदीवमधून आपले सैनिक परत घेण्याची औपचारिक विनंती केली.'' मालदीवचे राष्ट्रपती म्हणाले की, ''मालदीवच्या जनतेने सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारताकडे याबाबत मागणी करण्यासाठी त्यांना जनादेश दिला आणि आशा व्यक्त केली की, भारत मालदीवच्या लोकांच्या इच्छेचा आदर करेल."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT