Mahua Moitra Expelled from Lok Sabha Over Cash-For-Query Charge Saam Tv
देश विदेश

Mahua Moitra News: मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

Mahua Moitra expelled from Lok Sabha: एक मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

Satish Kengar

Mahua Moitra expelled from Lok Sabha :

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याच्या कथित आरोपांची चौकशी नितिमत्ता आयोगाकडून करण्यात आली होती. मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस आयोगाने केली होती. तसा अहवाल शुक्रवारी लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आला.

लोकसभेत त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या कारवाईचा विरोध करत, विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात जोरदार गदारोळ केला. मोईत्रा यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांचे खासदार सभागृहातून बाहेर पडले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारवाईनंतर महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितिमत्ता समितीनं पुरावे नसताना ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असा दावा मोईत्रा यांनी केला. (Latest Marathi News)

महुआ मोईत्रा म्हणाल्या की, मला गप्प केल्याने अदानी प्रकरणातून आपली सुटका होऊ शकते, असे मोदी सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्या म्हणाले की, या कांगारू कोर्टाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे की, अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि एका महिला खासदाराला त्रास देण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात.

त्या म्हणाल्या की, नीतिमत्ता समितीच्या अहवालात प्रत्येक नियम मोडला गेला आहे. मी 49 वर्षांची आहे आणि पुढची 30 वर्षे संसदेच्या आत आणि बाहेर तुमच्याशी लढत राहीन, असं त्या म्हणाल्या. मोइत्रा यांनी दावा केला की, त्यांच्या अहवालात जे काही नैतिक आढळले ते एकमेकांपासून भिन्न असलेल्या दोन लोकांच्या साक्षीवर आधारित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT