Atiq Ahmed Encounter
Atiq Ahmed Encounter SaamTV
देश विदेश

Atiq Ahmed News: मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या

साम टिव्ही ब्युरो

Atiq Ahmed Encounter : उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये ही घटना घडली असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश पोलिस अतिक अहमद आणि अश्रफ अहमद या  दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. यावेळी प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोलिसांच्या गाडीवर अज्ञात्यांनी हल्ला केला. (Breaking Marathi News)

या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

अतिक अहमद हा २००५ साली झालेल्या बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. याशिवाय यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही तो प्रमुख आरोपी होता. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये खून, खंडणी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 

दरम्यान उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला हत्या प्रकरणात अटक केली होती. काही दिवसांपूर्वी अतिकला गुजराच्या साबरमती तुरुंगातून त्याला नुकतंच प्रयागराज तुरुंगात हलवलं होतं. आपल्याला गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशात ट्रान्झिट रिमांड नको होती. पण अखेर त्याला जी भीती वाटत होती ती खरी ठरली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख घेतले; सुटीवर असताना महिला अधिकारीने स्वीकारली लाच

Kalyan Crime: विनापरवाना मद्य विक्री प्रकरणी महिलेसह दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची डोंबिवलीत धडक कारवाई

KL Rahul- Sanjiv Goenka: केएल राहुलचा अपमान करणं महागात पडलं! LSG च्या मालकांवर क्रिकेट एक्सपर्ट भडकले

Bathwater: प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच अंघोळीचे पाणी विकले; कंपनीने ठोठावला ९०,००० डॉलरचा दंड

Today's Marathi News Live : पुणे शहराला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT