Hemant Soren Bail Saam Tv
देश विदेश

Hemant Soren Bail: मोठी बातमी! तब्बल 5 महिन्यांनंतर हेमंत सोरेन तुरुंगाबाहेर, जमीन घोटाळ्याप्रकरणी मिळाला जामीन

Hemant Soren News: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगातून सुटका करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. घरी पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. आई-वडिलांचे आशीर्वाद घेतल्यानंतर हेमंत सोरेन यानू माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी एकीकडे न्यायालयाचे आभार मानले तर दुसरीकडे केंद्र सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचाही त्यांनी उल्लेख केला. हेमंत सोरेन यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे काम पाहणाऱ्या त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन म्हणाल्या की, आजचा दिवस खूप भावनिक आहे आणि भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी आहेत.

तर माध्यमांशी संवाद साधताना हेमंत सोरेन म्हणाले, मी पाच महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलो. हे पाच महिने या राज्यासाठी, आपल्या झारखंडी बांधवांसाठी आणि इथल्या मूळ आदिवासींसाठी चिंतनाचे वैचारिक राहिले आहेत. मी का तुरुंगात गेलो आणि अखेर न्यायालयाने न्याय दिला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. यानंतर मी आज बाहेर आलो. मी न्यायालयाचा आदर करतो. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकारांना ज्या प्रकारे अटक केली जात आहे, त्याबद्दल आपण चिंतेत असल्याचे सोरेन म्हणाले.

खोट्या प्रकरणात मला पाच महिने तुरुंगात डांबण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही उल्लेख केला आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, असं ते म्हणाले.

सोरेन म्हणाले की, 'न्याय मिळण्यासाठी लागणारा वेळ... अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना त्रास दिला जातो. खोट्या खटल्यात मला पाच महिने तुरुंगात डांबले. अशाप्रकारे देशाच्या विविध भागात पत्रकारांचा आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

थंडीचा कडाका; शाळांच्या वेळेत मोठा बदल, पालिकेने काय निर्णय घेतला? VIDEO

Pune : "प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

Traffic Police: ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस वाहनांवर कारवाई करू शकतात का? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

SCROLL FOR NEXT