Arvind Kejriwal: तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना CBI ने आताच का केली अटक?, समोर आलं मोठं कारण

Arvind Kejriwal Arrested By CBI: सीबीआयने अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली त्यानंतर त्यांना अटक केली. सीबीआयने त्यांना आज ट्रायल कोर्टात देखील हजर केले होते.
Arvind Kejriwal: तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना CBI ने आताच का केली अटक?, समोर आलं मोठं कारण
Arvind KejriwalSaam Tv

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अरविंद केजरीवाल यांना तिहार तरुंगातून सीबीआयने अटक केली. आधीच तुरुंगामध्ये असतानाही अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने (CBI) अटक केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली त्यानंतर त्यांना अटक केली. यानंतर सीबीआयने त्यांना ट्रायल कोर्टात हजर केले. मात्र सुनावणीदरम्यान त्यांची शुगर लेव्हल कमी झाली.

अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावल्यानंतर सुनावणी थांबवून त्यांना वेगळ्या खोलीत नेण्यात आले. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर ते आधीच तुरुंगात असताना त्यांना अटक का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात सीबीआयने सुनावणीदरम्यान सांगितले की,'अरविंद केजरीवाल यांना अटक करणे आता आवश्यक आहे. कारण आम्हाला जुलैपर्यंत तपास पूर्ण करायचा आहे.'

कोर्टात सुनावणीदरम्यान सीबीआयने सांगितले की, 'केजरीवाल प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. जेव्हा त्याला गोव्याच्या सहलीबद्दल, त्याच्या हॉटेलच्या मुक्कामाच्या पेमेंटबद्दल विचारले जाते तेव्हा ते उत्तर देतात की मला काहीच आठवत नाही. तर, त्याचे पेमेंट हवालाद्वारे झाल्याचे वास्तव आहे.' सीबीआयने असेही सांगितले की, 'अरविंद केजरीवाल 11 वेळा गोव्यात गेले. आमच्याकडे तिकिटे आहेत. पैसे भरल्याची नोंद आहे. पण त्यांना त्याबद्दल विचारले असता ते आठवत नाही असे उत्तर देतात. हे काही 10 वर्षांपूर्वी घडलेले नाही आणि ते विसरले आहेत.'

Arvind Kejriwal: तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना CBI ने आताच का केली अटक?, समोर आलं मोठं कारण
Arvind Kejriwal Arrest : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना CBI कडून अटक, पाहा VIDEO

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना आताच का अटक केली याबद्दल सांगितले की, 'आम्हाला केजरीवाल यांच्या सहआरोपी आणि कागदपत्रांसोबत समोरासमोर यावे लागेल. याबाबत चौकशी करायची असल्याने रिमांडची गरज आहे. केजरीवाल यांना आत्ताच अटक का करण्यात आली, असा सवाल कोर्टाने केला. यावर सीबीआयने सांगितले की, 'केजरीवाल यापूर्वी सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामिनावर बाहेर आले होते. निवडणूक प्रचारासाठी त्यांना जामीन मिळाला होता. त्यांना अटक केली असती तर चुकीचा संदेश गेला असता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रतिष्ठा पणाला लावायची नव्हती.'

Arvind Kejriwal: तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना CBI ने आताच का केली अटक?, समोर आलं मोठं कारण
Arvind Kejriwal Bail: CM केजरीवालांना झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला! हायकोर्टाकडून कनिष्ठ न्यायालयाचा जामिनाचा निर्णय रद्द

सीबीआयने असे देखील सांगितले की, 'अरविंद केजरीवाल हे सत्य नाकारत आहेत की विजय नायर त्यांच्या हाताखाली काम करत होते. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे केजरीवाल सांगत आहेत. केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर अबकारी धोरणाची माहिती नसल्याचे सांगत संपूर्ण जबाबदारी टाकली आहे.'

Arvind Kejriwal: तुरुंगात असतानाही अरविंद केजरीवाल यांना CBI ने आताच का केली अटक?, समोर आलं मोठं कारण
Delhi Water Crisis: मोठी बातमी! पाणी प्रश्नासाठी उपोषणाला बसलेल्या 'आप' नेत्या आतिशी यांची प्रकृती खालावली; मध्यरात्री रुग्णालयात दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com