Congress Working Committee meeting in Delhi today Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Opposition Leader: राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार, काँग्रेसच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेत्यापदाची जबाबदारी राहुल गांधी यांना देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. जी आता CWC च्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे.

Satish Kengar

काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पक्षाचे संघटनेचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी ही माहिती दिली.

ते म्हणाले, 'सीडब्ल्यूसीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुलजी योग्य व्यक्ती आहेत.'' वेणुगोपाल यांना विचारण्यात आले की, या प्रस्तावावर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय होती? ते म्हणाले, 'यावर माजी राहुल गांधी यांनी आपण विचार करू, असे सांगितले आहे.'

काँग्रेस सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करावे. ही सर्वांची मागणी असून यातूनच काँग्रेस मजबूत होईल.

बैठकीनंतर काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले, 'जेव्हाही काँग्रेस पक्षाला राहुल गांधींकडून काही अपेक्षा होत्या, तेव्हा त्यांनी पक्षाच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आज काँग्रेस पक्ष त्यांना देशाचा आवाज सभागृहात बुलंद करण्याची विनंती करतो. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते व्हावे, असे सर्वांचे म्हणणे असून हेच व्हायला हवे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकल्या 99 जागा

पक्षाच्या संसदीय पक्षाचा नेता कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षाचा नेता असेल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाचेही कौतुक करण्यात आले.

याबाबतचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर सदस्य आणि कार्यकारिणीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT