Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी?, वाचा संपूर्ण लिस्ट

PM Narendra Modi Oath Ceremony Update: नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या ९ जून रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशासह परदेशातील ९ हजारांपेक्षा जास्त मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे.
Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण लिस्ट
Pm Narendra ModiSaam Tv
Published On

देशामध्ये सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होणार आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा (pm narendra modi oath ceremony) येत्या ९ जून रोजी म्हणजे रविवारी होणार आहे. या शपथविधी सोहळयासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. जगभरातील दिग्गज व्यक्तींना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही शपथ घेऊ शकतात. सध्या मोदी ३.० च्या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे आली आहेत.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या ९ जून रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशासह परदेशातील ९ हजारांपेक्षा जास्त मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या ३.० ने आपल्या मंत्रिमंडळातील युतीच्या साथीदारांचीही पूर्ण काळजी घेतली आहे. मात्र भाजप महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवू शकते. सध्या अनेक जणांची नावं चर्चेत आली आहेत. ही नावं कोणा-कोणाची आहेत हे आपण पाहणार आहोत...

Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण लिस्ट
Loksabha Election: शिंदे गटाच्या पराभवाला भाजप जबाबदार? भाजपच्या सर्व्हेवर शिंदे गटाचा ठपका

मोदी सरकार ३.० मध्ये या खासदारांच्या नावांची चर्चा -

१) पियुष गोयल - भाजप (महाराष्ट्र)

२) नारायण राणे - भाजप (महाराष्ट्र)

३) नितीन गडकरी - भाजप (महाराष्ट्र)

४) संदिपान भुमरे - शिवसेना शिंदे गट (महाराष्ट्र)

५) प्रतापराव जाधव - शिवसेना शिंदे गट (महाराष्ट्र)

६) प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (महाराष्ट्र)

७) जी किशन रेड्डी - भाजप (तेलंगणा)

८) बंदी संजय - भाजप (तेलंगणा)

९) एटाला राजेंद्र - भाजप (तेलंगणा)

१०) डीके अरुणा - भाजप (तेलंगणा)

११) डॉ. के लक्ष्मण - भाजप (तेलंगणा)

१२) राम मोहन नायडू - टीडीपी (आंध्र प्रदेश)

१३) हरीश - टीडीपी (आंध्र प्रदेश)

१४) चंद्रशेखर - टीडीपी (आंध्र प्रदेश)

१५) पुरंदेश्वरी - भाजपा (आंध्र प्रदेश)

Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण लिस्ट
Loksabha Election: नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान; मोदींना २१ पक्षांचे समर्थन

१६) रमेश - भाजप (आंध्र प्रदेश)

१७) बाळा शौरी - जनसेना पक्ष

१८) सुरेश गोपी - भाजप (केरळ)

१९) व्ही. मुरलीधरन - भाजप (केरळ)

२०) राजीव चंद्रशेखर - भाजप (केरळ)

२१) एल मुर्गन - भाजप (तामिळनाडू)

२२) के अन्नामलाई - भाजप (तामिळनाडू)

२३) एचडी कुमारस्वामी - जेडीएस (कर्नाटक)

२४) प्रल्हाद जोशी - भाजप (कर्नाटक)

२५) बसवराज बोम्मई - भाजप (कर्नाटक)

२६) जगदीश शेट्टर - भाजप (कर्नाटक)

२७) शोभा करंदलाजे- भाजप (कर्नाटक)

२८) डॉ.सी.एन. मंजुनाथ - भाजप (कर्नाटक)

Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण लिस्ट
Elon Musk: एलन मस्क यांनी नरेंद्र मोदींना दिल्या शुभेच्छा, भारतात टेस्लाच्या कामाबद्दल केली मोठी घोषणा

याशिवाय एनडीएचा आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडलाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा खासदार लालन सिंह आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Modi 3.0 Cabinet Ministers: मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये कोण-कोणत्या खासदारांना मिळणार संधी, वाचा संपूर्ण लिस्ट
Sanjay Raut On Narendra Modi: संविधानासमोर नतमस्तक झालेले मोदी ढोंगी, संजय राऊत यांचा निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com