K Chandrashekhar Rao In Nanded Saamtv
देश विदेश

KCR In Solapur : के चंद्रशेखर राव महाराष्ट्र दौऱ्यावर, तेलंगणात BRS पक्षाला खिंडार; पक्षातील बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

K Chandrashekar Rao : के चंद्रशेखर राव दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Solapur News : भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचे प्रमुख, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले आहेत. केसीआर आज सोलापूर येथे मुक्काम करणार आहे. ते दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

कीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करत आहे. महाराष्ट्रात पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तेलंगणात बीआरएस पक्षाला खिंडार पडलं आहे. त्यांच्या पक्षातील अनेक नेते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार आहे. (Maharashtra Politics)

काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे नेते कोण?

  • ज्युपली कृष्णा राव, माजी मंत्री (२०१४-२०१८)

  • पी.श्रीनिवास रेड्डी , माजी खासदार

  • दामोदर रेड्डी , आमदार विधान परिषद

  • गुरुनाथ रेड्डी माजी आमदार (पाच वेळा आमदार)

  • आणखी 5 माजी आमदार

  • 20 इतर महत्वाचे नेते

  • बीआरएस पक्षातील अनेक पदाधिकारी

के चंद्रशेखर राव विठ्ठल दर्शनानंतर उद्या 27 जुन रोजी 3.30 वाजता तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. केसीआर दौऱ्यावर येणार म्हणून त्यांचे बॅनरही तुळजापूर शहरात लागले आहेत. सध्या बीआरएस पक्ष महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुख्यमंत्री केसीआर हे पूर्ण मंत्रिमंडळ व महत्वाचे पदाधिकारी अशा ताफ्यासह आज सोलापुरात येतील. त्यानंतर ते 27 जुन रोजी पंढरपूर जाऊन विठ्ठल दर्शन घेतील. त्यानंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन हैद्राबादला जातील असा नियोजित दौरा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक- CM फडणवीस

Styling Tips: महागडे कपडे न घालताही दिसाल एकदम क्लासी! लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ स्टाइलिंग टिप्स

Dangerous Fort : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Maharashtra News Live Update: सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

Snake Bite: सापाचे विष किती प्रकारचे असते, शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT