Cold-Cough Medicine Saam Tv
देश विदेश

Cold-Cough Medicine: लहान मुलांना सर्दी-खोकल्याची 'ही' औषधं देण्यावर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Central Government On Medicine: केंद्र सरकारने औषधांबाबत मोठा निर्णय घेतला. लहान मुलांना सर्दी-खोकल्याचे औषध देण्यावर सरकारने बंदी घातली आहे.

Priya More
  • ४ वर्षांखालील मुलांसाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं

  • सर्दी खोकल्याच्या या औषधांवर केंद्र सरकारने मोठा निर्णय

  • लहान मुलांना सर्दी खोकल्याचे औषध देण्याबाबत सरकारचे नवीन नियम जारी केले

  • क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड औषधांवर बंदी

केंद्र सरकारने औषधांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचललं आहे. ४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी आणि खोकल्याच्या औषधांच्या वापरावर सरकारकडून बंदी घातण्यात आली आहे. सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलेट  (Chlorpheniramine Maleate)  आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड  (Phenylephrine Hydrochloride) असलेल्या सर्व निश्चित-मात्रेच्या मिश्रणांवर बंदी घातली आहे. ही सर्व औषधं सर्दीसाठी दिली जातात. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि संभाव्य दुष्परिणामांबद्दल गंभीर तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांबााबत आज मोठा निर्णय घेतला आहे. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर कडक निर्बंध लादले आहेत. या सर्व प्रकारच्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. हे मिश्रण लहान मुलांसाठी असुरक्षित असून त्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले आहे.

सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक असलेल्या सर्व एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधं ४ वर्षांखालील मुलांसाठी वापरू नयेत असं औषधांवर लिहिणं बंधकारक असणार आहे. हा अलर्ट औषधाच्या लेबलवर, पॅकेज इन्सर्टवर आणि प्रचारात्मक साहित्यावर स्पष्टपणे दर्शवला पाहिजे असे केंद्र सरकारने सांगितले. केंद्र सरकारने औषध कंपन्यांना लेबलआणि पॅकेजवर स्पष्टपणे नमूद करण्यास सांगितले आहे की, हे औषध चार वर्षांखालील मुलांसाठी नाही.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार, सरकारने तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सांगितले की, या औषध मिश्रणांच्या वापरामुळे ४ वर्षांखालील मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. तर याच वयोगटातील मुलांसाटी तुलनेने सुरक्षित औषधांचे पर्याय उपलब्ध आहेत. याआधी १५ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या विशिष्ट एफडीसींवर वयाशी संबंधित अशाच इशारा केंद्र सरकारने लागू केला होता. सरकारने आता या तरतुदीची व्याप्ती वाढवून त्यात हे दोन घटक असलेल्या सर्व फॉर्म्युलेशन्सचा समावेश केला आणि या औषधांवर बंदी घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan's Gym Fire: सलमान खानच्या जिमला भीषण आग; नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Today Live : महिलांवर अत्याचार करणे हे बीजेपीचा पॅटर्न- खासदार प्रणिती शिंदे

BMC Officer Transfer : मुंबई महापालिकेच्या विधी विभागात मोठा फेरबदल! २० अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: योग्य दिशेने जाणारा युवा समाजाला जगवतो - देवेंद्र फडणवीस

तुम्ही खात असलेल्या मसाल्यांमध्ये भेसळ आहे का? या ५ पद्धतीने आजच तपासा नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

SCROLL FOR NEXT