Texas Dairy Farm: अमेरिकेतल्या (America) टेक्सासमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या भीषण स्फोटात (US Dairy Farm Explosion) जवळपास १८ हजार गायींचा मृत्यू झाला. टेक्सासच्या डिमिटमधील साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये ही दुर्घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये १८ हजारांपेक्षा जास्त गायींचा होरपळून मृत्यू झाला.
डेअरी फार्मला (Texas Dairy Farm) लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिका-यांना खूप प्रयत्न करावे लागले. हा स्फोट इतका भीषण होता की काही वेळातच हे संपूर्ण डेअरी फार्म जळून खाक झाले. या स्फोटामध्ये डेअरी फार्मचा एक कर्मचारी गंभीररित्या भाजला आहे. जखमी अवस्थेत या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या डेअरी फार्ममध्ये दूध काढण्यासाठी सर्व गायी एकाच ठिकाणी बांधल्या गेल्या होत्या. त्याचवेळी हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर बराच वेळ आकाशामध्ये काळ्या धूराचे लोट पसरले होते. डेअरी फार्ममधील मशीन जास्त गरम झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस अधिकारी साल रिवेरा यांनी सांगितले की, 'जास्त वापरामुळे डेअरी फार्ममधील मशीन गरम झाले असावे. त्यामुळे मशीनमधून मिथेन वायू बाहेर पडू लागला असावा आणि हा स्फोट झाला असावा. या स्फोटानंतर फार्ममधील गायींच्या चाऱ्याला आग लागली असावी.'
अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात असलेल्या टेक्सासमध्ये झालेल्या या भीषण स्फोटाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आग लागल्यानंतर या डेअरी फार्ममधून जे धुराचे लोट बाहेर येत होते यावरुन या स्फोटाची भीषणता समजते. या डेअरी फार्ममध्ये नेमका स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अमेरिकेतल्या फार्मेला लागलेली ही आग आतापर्यंतची सर्वांत मोठी दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे. या डेअरी फार्मच्या मालकाने या घटनेवर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही. या स्फोटाचा तपास सध्या सुरु आहे.
अमेरिकेत आतापर्यंत आग लागून प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,' 2013 पासून अमेरिकेत आगीमुळे सुमारे 6.5 लाख गुरे मरण पावली आहेत. त्याच वेळी, 2018 ते 2021 या काळात सुमारे 30 लाख गुरे मरण पावली आहेत. तर 2016 मध्ये टेक्सासमध्येच हिमवादळामुळे 2 दिवसांत 35 हजार गायींचा मृत्यू झाला होता.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.