India Corona Update: चिंता वाढली! देशावरील कोरोनाचे सावट आणखी गडद, 24 तासांत 11 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Corona Virus: कोरोनामुळे केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचे देखील टेन्शन वाढले आहे.
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv
Published On

Delhi News: कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा सर्वांची झोप उडवून टाकली आहे. सध्या देशामध्ये कोरोनाचा (Corona Virus) वेगाने प्रसार होत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रोज कोरोना रुग्णांचा (Corona Patient) धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. अशामध्ये गुरुवारी एका दिवसामध्ये देशात 11 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंत सर्वांत मोठा आकडा आहे. त्यामुळे केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचे देखील टेन्शन वाढले आहे.

India Corona Update
Corona In India : ५ राज्यांनी वाढवलं टेन्शन; ६५ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण, महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत 11,109 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक दिवस आधी म्हणजे बुधवारी देशभरात कोरोनाचे 10,158 नवीन रुग्ण आढळले होते. दिल्लीमध्ये 24 तासांत 1,527 कोरोना रुग्ण आढळले. तर दोन कोरोना रुग्णां मृत्यू झाला. दिल्लीमध्ये सध्या 4 हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 909 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

India Corona Update
Sharad Pawar Meets Rahul Gandhi: विरोधकांचं ठरलं! वज्रमुठ घट्ट; शरद पवार यांच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले...

महाराष्ट्रात देखील कोरोनामुळे चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत 1,086 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत राज्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईत कोरोनाचे 274 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 5,700 वर पोहचला आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे.

India Corona Update
Navi Mumbai MNS News: राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

दरम्यान, देशामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे. अनेक राज्यामध्ये मास्कची सक्ती देखील करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हरियाणा, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसंच, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, दारुची दुकानं, हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्र, सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक कार्यालयांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे सक्तीचे असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com