Corona In India : ५ राज्यांनी वाढवलं टेन्शन; ६५ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण, महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

Covid 19 Cases In India : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत १७ हजारांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे.
Covid 19 Cases In India
Covid 19 Cases In India SAAM TV
Published On

Covid 19 Cases In India : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत १७ हजारांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे. ८ महिन्यांनंतर प्रथमच एका दिवसाला १० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एकाच दिवशी १०,१५८ कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चाललेला असतानाच, सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती ४४,९९८ पर्यंत पोहोचली आहे. (Latest Marathi News)

Covid 19 Cases In India
India Corona Update : देशभरात कोरोनाचा धोका वाढला, एका दिवसात आढळले 10 हजारांहून अधिक नवीन रुग्ण

५ राज्यांत २९ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण

देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४४, ९९८ इतके आहेत. ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ६५ टक्क्यांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या ५ ठिकाणी २९, ३५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एक हजाराहून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. त्रिपुरात एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही. तर २ केंद्रशासित प्रदेशांतही एकही कोरोना रुग्ण नाही.

हरयाणा सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येत पाचव्या स्थानी आहे. या ठिकाणी २४२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. चौथ्या स्थानी तामिळनाडू आहे. तेथे २४८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid 19 Cases In India
Mumbai Monsoon 2023: आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर, या दिवशी मुंबईत दाखल होण्याची शक्यता!

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्ली सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येत तिसऱ्या स्थानी आहे. सध्या दिल्लीत ३३४७ सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीत बुधवारी कोरोनाचे ११४९ रुग्ण आढळले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचे ५४२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी कोरोनाचे १११५ रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत ३२० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. ही मागील वर्षी ३ सप्टेंबर २०२२ नंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत. दक्षिणेकडील या राज्यात कोरोनाचे १६३०८ सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com