Jammu Kashmir: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; 3 दहशतवादी ठार Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; 3 दहशतवादी ठार

जम्मू- काश्मीर मधील बडगाम येथील जोलवा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीर मधील बडगाम (Budgam) येथील जोलवा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorists) मोठी चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ३ दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बडगाममध्ये झालेल्या चकमकीमध्ये ३ दहशतवादी ठार झाल्याचे आयजीपी काश्मीर यांनी माहिती दिली आहे. तसेच, चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याची संघटना आणि त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यांच्याकडून शस्त्रे (Weapons) आणि दारूगोळ्यांबरोबरच अनेक आपत्तिजनक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यामध्ये (district) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. एका पोलीस (Police) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावामध्ये (village) शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक सुरू झाली.

जम्मू- काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुलवामामध्ये (Pulwama) बुधवारी झालेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी जैश- ए- मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी (Pakistani) नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी अखेर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

काश्मीर मधील पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून २ एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-४७ रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतच ही पाचवी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवानांनी ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव सुरू

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

Maharashtra Tourism: वीकेंडला कुठं जावं? शांत, सुंदर आणि निवांत…; नागपूरमधील 'ही' ठिकाणं पिकनिकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT