Big Breaking: Supreme Court Rahul Gandhi Plea To Stay Conviction In Defamation Case Over Modi Surname Remark SAAM TV
देश विदेश

Big Breaking On Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळणार?

Supreme Court verdict on Rahul Gandhi: मोदी आडनावाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली आहे.

Satish Daud

Supreme Court Verdict on Rahul Gandhi:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावप्रकरणात सुनावण्यात आलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने आज स्थिगिती दिली आहे. मोदी आडनावाप्रकरणी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मार्च २०२३ मध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, गुजरात हायकोर्टाने ७ जुलै रोजी यावर सुनावणी घेत शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, "पूर्णेश मोदी हे मुळात मोदी समाजातील नाहीत. यापुर्वी कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. त्यामुळे माफी न मागितल्याने अहंकारी म्हणणे चुकीचे आहे.  'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल माफी मागण्याची गरज नाही. कारण मी दोषी नाहीच. जर त्यांना माफी मागून विषय संपवायचा असता तर त्यांनी ते खूप आधीच केले असते, असे राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जबाबात म्हटलं होतं. 

सुप्रीम कोर्टात काय झालं?

आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली. राहुल गांधी यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, तर पूर्णश मोदी यांच्यावतीने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांना युक्तीवादासाठी १५-१५ मिनिटाचा अवधी मिळाला. राहुल गांधी यांनी संपूर्ण समाजाचा अपमान केलेला नाही, अशा परिस्थितीत केवळ राहुल यांनाच अशी शिक्षा झाली आहे, असा युक्तिवाद राहुल गांधी यांच्या वतीने करण्यात आला आहे.

कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली. “आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.

राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळणार?

राहुल गांधी यांना दोन वर्षांपेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असं आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT