Manipur Clashes Update: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना! पोलिसाची निर्घृण हत्या, जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करत शस्त्रे पळवली

Manipur Mob Killed Policeman: जमावाने गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात दोन पोलीस चौक्यांची तोडफोड केली.
Manipur Clashes
Manipur ClashesSaam Tv
Published On

Manipur Clashes News: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार (Manipur Clashes) सुरु आहे. हा हिंसाचार थांबायचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये वारंवार जाळपोळ, हल्ला, दगडफेक यासारख्या घटना घडताना दिसत आहेत. अशामध्ये मणिपूरमध्ये गुरुवारी पुन्हा हिंसाचाराची घटना घडली. इम्फाळ पश्चिममध्ये उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला. जमावाने गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात दोन पोलीस चौक्यांची तोडफोड केली. त्यानंतर हा जमाव स्वयंचलित बंदुकांसह शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन पळून गेले.

Manipur Clashes
Big Breaking On Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळणार?

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील मणिपूर सशस्त्र पोलिसांच्या दुसऱ्या बटालियनच्या केरेनफाबी पोलीस चौकी आणि थंगलवाई पोलीस चौकीवर जमावाने हल्ला केला. या पोलीस चौकीवर पुरुष आणि महिलांच्या जमावाने तोडफोड केली. त्यानंतर या जमावाने हेंगांग आणि सिंगजामेई पोलीस स्टेशनमधून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु या जमावाचा हल्ला सुरक्षा दलांनी हाणून पाडला.

Manipur Clashes
BJP Issues 3 Line Whip: सरकारविरुद्ध अविस्ताव प्रस्तावावर ३ दिवस चर्चा, भाजप खासदारांना ५ दिवसांसाठी ३ ओळींचा व्हीप

मणिपूरच्या कौत्रुक, हरोथेल आणि सेंजम चिरांग भागात सशस्त्र हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एका पोलिसासह दोन जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम येथील सेंजम चिरांग येथे ही घटना घडली. डोक्यात गोळी लागल्याने मणिपूर पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला आहे.

Manipur Clashes
Kedarnath Landslide: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळली; अनेक भाविक दबल्याची भीती

तर, बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगाकचाओ इखाई येथे 500-600 लोकांचा मोठा जमाव जमला होता. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये 25 जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील परिस्थिती अजूनही अस्थिर आणि तणावपूर्ण राहिली आहे. ठिकठिकाणी गोळीबार आणि जमावाने हल्ला केल्याच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Manipur Clashes
Seema Haider In 2024 Election: सीमा हैदर 2024 ची निवडणूक लढवणार? एनडीएच्या मित्रपक्षाकडून मिळाली मोठी ऑफर

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना लक्षात 129 ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सरकार आणि पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 1,047 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात हल्लेखोरांनी सुरक्षा दलांचा 300 हून अधिक शस्त्रे आणि दारूगोळा लुटला आहे.

मणिपूरमधील परिस्थिती आधूनमधून हाताबाहेर जात आहे. जमावाकडून सतत जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडतच आहेत. अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे तर काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com