BJP Issues 3 Line Whip: सरकारविरुद्ध अविस्ताव प्रस्तावावर ३ दिवस चर्चा, भाजप खासदारांना ५ दिवसांसाठी ३ ओळींचा व्हीप

Assembly Monsoon Session Update : या कालावधीमध्ये सभागृहात उपस्थित राहण्यासाठी, सरकारच्या भूमिकेला आणि विधेयकांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे.
BJP Issues 3 Line Whip
BJP Issues 3 Line WhipSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली

Delhi News:

भाजपने (BJP) आपल्या लोकसभा खासदारांना (Loksabha MP) तीन ओळींचा व्हिप (Three Line Whip) जारी केला आहे. भाजपने आपल्या खासदारांना ५ दिवसांचा हा व्हिप जारी केला आहे. या कालावधीमध्ये सभागृहात उपस्थित राहण्यासाठी, सरकारच्या भूमिकेला आणि विधेयकांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे.

BJP Issues 3 Line Whip
Jaipur Express Firing: जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण, RPF ने घेतला मोठा निर्णय; ट्रेनमध्ये स्वयंचलित रायफलला बंदी

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर केल्यानंतर भाजपने ते राज्यसभेत मंजूर करण्याकडे फोकस केला आहे. विरोधी पक्षाच्या 'इंडिया' अघाडीने मणिपूर मुद्यावरून सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे त्यावर लोकसभेत चर्चा होणार आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ही चर्चा होणार आहे.

BJP Issues 3 Line Whip
Mumbai BEST Worker Protest: मुंबईकरांचे हाल! सलग तिसऱ्या दिवशीही बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. त्यासाठी भाजपकडून 7 ऑगस्ट ते अधिवेशन संपेपर्यंत म्हणजेच 11 ऑगस्ट पर्यंत तीन ओळींचा व्हीप सर्व खासदारांसाठी जारी करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षांकडून चर्चेदरम्यान गोंधळ घातला जाऊ शकतो. चर्चेवेळी सत्ताधारी बाकावर आपल्या खासदारांचे संख्याबळ पुरेपूर असावं यासाठी भाजपने सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे.

BJP Issues 3 Line Whip
Pune Terrorist Case Update: पुणे दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट; सासरा, मेहूणा आणि जावयाने रचला होता स्फोटाचा कट

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचोसबत त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे अनेकदा संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 ऑगस्ट रोजी या मुद्द्यावर बोलणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com