Pune Terrorist Case Update: पुणे दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट; सासरा, मेहूणा आणि जावयाने रचला होता स्फोटाचा कट

Pune Terrorist News: याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना एटीएसने अटक केली आहे.
Pune Terrorist Case
Pune Terrorist Case Saam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये (Pune Terrorist Case) एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पुण्यातल्या कोथरूड परिसरातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. या चौकशीतून मोठी अपडेट समोर आली आहे. सासरा, मेहूणा आणि जावयाने दहशतवादी कारवायांचा कट रचला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना एटीएसने अटक केली आहे.

Pune Terrorist Case
Pune News: दुर्दैवी! खेकडे पकडायला जाणं जीवावर बेतलं, सख्ख्या बहीण-भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इसिस मॉड्यूल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला आणि एनआयने अटक केलेला अदनानली सरकार यांचे नाते आता समोर आले आहे. झुल्फिकार अली बडोदावालाचा मेहुणा म्हणजेच अदनानली सरकार आणि सरकारचा सासरा म्हणजे झुल्फिकारचे वडील अली बदोडावला हे या संशयित दहशतवादी मॅाड्युलचे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे.

Pune Terrorist Case
Statistics Of Pune Accident: पुणेकरांनो सावधान! रस्ते अपघातात जातोय रोज एकाचा बळी; वर्षभरातील आकडेवारी चिंता वाढवणारी, कारण काय?

या सासरा, मेहूणा आणि जावयानेच पुण्यामध्ये दहशतवादी कारवायांचा कट रचला होता. रतलाम मॉड्यूल पाठोपाठ आता दहशतवादाचं बडोदावाला मॉड्यूल समोर आले आहे. झुल्फिकार आणि अदनानली हे दर्स म्हणजे प्रवचनाच्या नावाखाली तरूण मुलांना धर्माची चुकीची माहिती द्यायचे आणि त्यांची माथी भडकवायची कामे करत असल्याचे देखील सांगितले जात आहे. झुल्फिकार सध्या एटीएसच्या कोठडीत आणि सरकार हा एनआयएच्या कोठडीत आहे. तर झुल्फिकारचे वडील अली बडोदावाला गुजरात जेलमध्ये आहे.

Pune Terrorist Case
Mumbai Crime News: वर्सोवा समुद्रात बुडून हरियाणाच्या २ तरुणांचा मृत्यू, मुंबईत आले कसे?

दरम्यान, कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादी विरोधी पथक म्हणजे एटीएसने आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इतर तिघांचा देखील दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असल्याच्या संबंधावरुनच त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून एकाला, गोंदियातून एकाला आणि ठाणे जिल्ह्यातून एकाला असे तिघांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com