Mumbai Crime News: वर्सोवा समुद्रात बुडून हरियाणाच्या २ तरुणांचा मृत्यू, मुंबईत आले कसे?

2 Youths Drowned In Versova Sea: हे तरुण मुंबईत आले कसे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Versova Beach
Versova BeachSaam tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Versova Beach: मुंबईतल्या वर्सोवा समुद्रामध्ये (Versova Beach) बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हे दोन्ही तरुण मूळचे हरियाणाचे रहिवासी होते. त्यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये (Versova Police Station) अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे तरुण मुंबईत आले कसे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Versova Beach
Samruddhi Mahamarg Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर कारचा धडकी भरवणारा अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सांयकाळी दोन तरुणांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत जीवरक्षकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले.

Versova Beach
Yuzvendra Chahal: ‘दिलसे बुरा लगता है भाई!’ बॅटिंगला जात असलेल्या चहलसोबत नेमकं काय घडलं? पाहा PHOTO

पोलिसांना एका तरुणाच्या खिशामध्ये मोबाईल सापडला. ज्याच्या मदतीने या तरुणाच्या कुटंबाशी पोलिसांनी संपर्क केला. तर हे तरुण हरियाणाचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दीपक बिश्त (वय 25) आणि हरदेव सिंग (वय 26) अशी या मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघेही चुलत भाऊ होते.

Versova Beach
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! कराटे शिकायला आलेल्या तरुणीसोबत प्रशिक्षकाचं भयानक कृत्य

एक तरुण नागपूरमध्ये तर दुसरा चेन्नईमध्ये कामाला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. नागपूर आणि चेन्नईला कामाला असताना हे दोन्ही तरुण मुंबईमध्ये आले कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. अशामध्ये पोलीस देखील हे तरुण मुंबईमध्ये आले कसे याचा तपास करत आहेत. त्याचसोबत या दोन्ही तरुणांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या अंदाज वर्तवला जात आहे. अशामध्ये वर्सोवा पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com