नवनीत तापाडिया, साम टीव्ही
Chhatrapati Sambhajinagar Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अत्याचार पीडितांमध्ये अविवाहित तरुणीचं प्रमाण सर्वाधिक आहे. प्रेमप्रकरणातून तसंच लग्नाचं वचन देऊन तरुणीवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे.
दोन बायकांपासून ५ अपत्ये आणि ३ वर्षाचा नातू असलेल्या एका ५० वर्षीय कराटे प्रशिक्षकाने २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग २ वर्ष अत्याचार केला. यादरम्यान पीडिता गरोदर राहिली असता, आरोपीने तिला दोन वेळा गर्भपात करायला लावला.
यानंतर पीडित तरुणीला घरातून हाकलून दिले आणि दुसऱ्या पत्नीला घरात घेतले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणीने पुंडलिक नगर पोलिसांनी कराटे प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
मिलिंद घोरपडे असे अटक करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ वर्षीय युवती बहिणीकडे राहत असे. दरम्यान, नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला कराटे शिकायचे असल्याने आरोपी मिलिंद घोडपडे याच्या कराटे क्लासमध्ये प्रवेश घेतला.
मिलिंद याने पीडितेला क्लासचे मॉनिटर केले. यावेळी मिलिंदने त्याने तिच्यासोबत जवळीक साधायला सुरुवात केली. माझी बायको मयत झाली आहे, मला मुलबाळ नाही, तुझ्याशी लग्न करेल, अशी थाप करत त्याने पीडितेचा विश्वास संपादीत केला. गोड बोलून घरी नेल्यावर बळजबरीने दोन वेळेस तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यासोबत संबंध ठेवले. २०२२ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर त्याने नोकरीचे आधी बघू, एवढ्यात मूल नको, असे सांगत गर्भपात करायला लावला. त्यानंतर मिलिंदने पैसा घेऊन सुमारे दोन लाखांची फसवणूक केली. घरी गेल्यावर तु माझ्या लग्नाची बायको नाही, असे त्याने आणि त्याच्या पत्नीने घरातून हाकलुन दिल्याचेही पिडीताने तक्रारीत नमूद केले आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.