Full details of Namo Bharat Train features : आता रेल्वेचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार आहे. रेल्वेकडून ५० नमो भारत आणि १०० मेनलाइन ईएमयू (MEMU) गाड्या तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी यांनी मंगळवारी नमो भारत आणि मेनलाइन ईएमयू (MEMU) गाड्यासंदर्भात घोषणा करतानाच अमृत भारत ट्रेनबाबतही महत्त्वाची माहिती दिली. या गाड्या 16-20 डब्यांच्या असतील, ज्यामुळे कमी अंतराच्या प्रवाशांना सुलभ प्रवास मिळेल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
नमो भारत ट्रेनच्या यशस्वी प्रारंभाचा संदर्भ देत अश्विनी वैष्णव म्हणाले, “सध्या कार्यरत असलेल्या दोन नमो भारत ट्रेनना मिळालेल्या जोरदार सार्वजनिक प्रतिसादाने प्रोत्साहात होऊन, आम्ही वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी ५० नवीन नमो भारत ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नमो भारत, पूर्वी वंदे मेट्रो म्हणून ओळखली जाणारी, ही वातानुकूलित स्वयंचलित गाडी वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ती बिनाराखीव प्रवाशांसाठी प्रीमियम लहान अंतर प्रवास देते. नमो भारत गाड्या 130 किमी/तास कमाल वेगाने धावतात, 1,150 बसलेल्या आणि 2,058 उभ्या प्रवाशांना सामावून घेतात. यात स्वयंचलित दारे, KAVACH अँटी-कॉलिजन सिस्टम, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, मोठे पॅनोरॅमिक खिडक्या, CCTV, आपत्कालीन संवाद युनिट्स आणि आधुनिक शौचालये यांसारख्या सुविधा आहेत. ही गाडी मेट्रोसारखी बसण्याची आणि उभे राहण्याची व्यवस्था देते, ज्यामुळे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल.
अमृत भारत ट्रेनच्या सुरुवातीबद्दल बोलताना, मंत्री म्हणाले, “तीन अमृत भारत ट्रेन सध्या कार्यरत आहेत आणि त्यांना जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत, आणखी सहा अमृत भारत ट्रेन सुरू केल्या जातील आणि, आणखी 50 ट्रेनचे उत्पादन सुरू आहे, आणि त्यानंतर आणखी तुकड्या येतील, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
प्रवासी रेल्वे सेवा अद्ययावत करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता 100 पेक्षा जास्त मेमू गाड्यांची क्षमता वाढवली जाईल — त्यांची रचना 8 ते 12 डब्यांवरून 16 ते 20 डब्यांपर्यंत वाढवली जाईल — ज्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. 100 पेक्षा जास्त मेमू गाड्यांच्या निर्मितीसाठी आंध्र प्रदेशातील काझीपेट येथे एक नवीन कारखाना उभारण्यात आला आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.