Supreme Court On Bilkis Bano Case Saam TV
देश विदेश

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारला झटका; दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Bilkis Bano Case Updates: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

Satish Daud

Bilkis Bano Case Latest Updates

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे. दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. ही याचिका सुनावणी योग्य आहे असं कोर्टानं मानलं असून, महिलांना सन्मानाचा अधिकार आहे, अशी टिप्पणी केली आहे.

जस्टिस बिवी नागरत्ना आणि जस्टिस उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ११ दोषींची सुटका केली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींची सुटका केल्यानं गुजरात सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली होती. दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिले होते. माफी करताना सुधारणा आणि प्रतिबंधात्मक तत्वे लक्षात ठेवली पाहिजे, असा युक्तीवाद इंदिरा जयसिंग यांनी केला होता. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.

आज म्हणजेच सोमवारी (८ जानेवारी) सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल जाहीर केला आहे. दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. ही याचिका सुनावणी योग्य असल्याचं मान्य करतानाच महिलांना सन्मानाचा अधिकार आहे, अशी टिप्पणी कोर्टानंं केली आहे. (Latest Marathi News)

बिल्किस बानो प्रकरण काय आहे?

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीत बिल्किस बानो या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता. या हिंसाचारात बानो यांच्या कुटुंबातील ७ जणांचाही मृत्यू झाला होता. तर कुटुंबातील इतर सहा जणांनी पळून जाऊन स्वत:चा जीव वाचवला. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पुढे मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व दोषींनी १५ वर्षे तुरुंगवास भोगला होता. यानंतर एका कैद्याने सुप्रीम कोर्टात धाव घेत मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली होती.

कोर्टाने गुजरात सरकारला राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश दिले होते. या समितीने सर्व ११ आरोपींना माफी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या या निर्णयाची माहिती राज्य सरकारला देण्यात आली. यानंतर या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.

Web Title: The Supreme Court has given an Important Verdict on the Decision to Acquit The Convicts in the Bilkis Bano Case

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT