Akhilesh Yadav Saam TV
देश विदेश

UP By-Election: अखिलेश यादव यांना मोठा झटका, माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश

पक्षाचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

वृत्तसंस्था

UP By-Election News : उत्तर प्रदेशातील मैनपुरी, रामपूर आणि खतौली येथे पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना आणखी एक धक्का बसू शकतो. कारण पक्षाचा आणखी एक नेता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप सोडून सपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री धरमसिंह सैनी बुधवारी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धरमसिंह सैनी खतौली येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धरमसिंह सैनी यांची गणना सहारनपूरच्या बड्या नेत्यांमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेश आणि विशेषत: खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

खरे तर सैनी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांच्याशी हातमिळवणी करून मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. सहारनपूरमधून निवडणूक हरल्यानंतर धरमसिंह सैनी यांना सपामध्ये बाजूला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

एकाच जागेवरून सलग चार वेळा आमदार

डॉ. धरमसिंह सैनी हे एकाच जागेवरून सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. ते 2002 मध्ये सरसावा विधानसभा मतदारसंघातून बसपाकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2007 च्या निवडणुकीत आणि पुन्हा 2012 मध्ये बसपकडून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि चौथ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी भाजप सोडून सपामध्ये प्रवेश केला. त्यांनी नाकुरमधून निवडणूक लढवली पण भाजप उमेदवार मुकेश चौधरी यांच्याकडून 315 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT