आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. बराच वेळ क्रमांक एकवर असलेल्या एलन मस्क यांना पहिलं स्थान गमावावं लागलं आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीत सोमवारी (ता. ४) तब्बल १७.६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ज्यामुळे ते थेट दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार,ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मस्क यांना मागे टाकत पहिलं स्थान काबीज केलंय. सध्या बेझोस यांची एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलरच्या घरात पोहचली आहे. (Latest Marathi News)
दुसरीकडे मस्क यांच्या संपत्तीत घट होऊन १९८ अब्ज डॉलर्सपर्यंत आली आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी बेझोस यांच्या एकूण संपत्तीत २३.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचवेळी मस्क यांची संपत्ती तब्बल ३१.३ अब्ज डॉलर्सनी घसरली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यांनी LVMH सीईओ आणि फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकले होते. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोण कुठल्या स्थानावर आहेत, सविस्तर जाणून घेऊयात...
१) जेफ बेझोस, (ॲमेझॉनचे संस्थापक) एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलर्स
२) एलन मस्क (टेस्ला, स्पेसएक्स, ट्विटर संस्थापक) एकूण संपत्ती १९८ अब्ज डॉलर्स.
३) बर्नार्ड अर्नॉल्ट (LVMH सीईओ आणि फ्रेंच उद्योगपती) एकूण संपत्ती १९७ अब्ज डॉलर्स.
४) मार्क झुकरबर्ग (मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ) एकूण संपत्ती १७९ अब्ज डॉलर्स.
५) बिल गेट्स (मायक्रोसॉफ्टचे संस्थापक) एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर्स.
या यादीत मुकेश अंबानी ११५ अब्ज डॉलर्स्या एकूण संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर, तर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी १२ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १०४ अब्ज डॉलर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.