नवी दिल्ली : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाजन्य परिस्थिती असतानाच आता अमेरिका आणि रशिया (US and Russia) या दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणल्याचे दिसत आहेत. कारण आता अमेरिकेने रशियावरती नवे आर्थिक निर्बंध लादले (Economic Restrictions) असून या बाबतची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी केली आहे.
रशियावर 2014 पेक्षा जास्त कडक निर्बंध लादले असून या अंतर्गत आता रशियाच्या दोन वित्तसंस्थांवर निर्बंध आणले आहेत तसंच रशियाकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग झाल्याचा दावा बायडेन यांनी केला आहे.
तसंच आपण युक्रेनला लष्करी मदत करणार असून उद्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू करणार असून याबाबत संरक्षणात्मक उपाययोजना करणार असल्याचंही बायडेन म्हणाले आहेत. मात्र या दोन्ही राष्ट्रांमधील कटुता वाढल्याने जगभराची चिंता वाढवली आहे.
निर्बंधाचे परिणाम -
रशियन बॅंकाना, कंपनीना आता पाश्यात्य संस्थांकडून आर्थिक कर्जपुरवठा होणार नाही नाही. यामुळे रशियन कंपनीशी व्यवहार करणं कठीण होणार, शिवाय आर्थिक निर्बंध लावले असले तरिही अमेरिकेने आंतरराष्ट्रीय निर्यात बंदी आणि व्यवहारावर बंदी घातलेली नाही.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.