Shocking News Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh Shocking News: वाघाच्या हल्ल्यातून तरूण थोडक्यात बचावला; अख्खी रात्र झाडावरच 'लटकला'

Bhopal News: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक भीतीदायक घटना घडली आहे. घरी जात असलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यातून तरूण थोडक्यात बचावला. वाघापासून बचाव करण्यासाठी तरुणानं एका झाडाचा आधार घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Madhya Pradesh Bhopal News :

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक भीतीदायक घटना घडली आहे. घरी जात असलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यातून तरूण थोडक्यात बचावला. वाघापासून बचाव करण्यासाठी तरुणानं एका झाडाचा आधार घेतला. अख्खी रात्र त्यानं झाडावर बसून काढली.

ही घटना मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील मुदगुरी घघादर गावातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या धामोखर बफर झोनमध्ये घडली.

उमारिया येथील धवडा कॉलनीतील रहिवासी कमलेश सिंगवर वाघाने हल्ला केला. घरी परत जात असताना कमलेशसोबत ही भयानक घटना घडली.

कमलेश सिंग उमारियाच्या दिशेने जात असताना जंगलात हा प्रकार घडला. संध्याकाळच्या वेळी कमलेश रानडुक्करांचा पाठलाग करत होता. त्यावेळी त्याच्यासमोर अचानक वाघ आला. कमलेश प्रचंड घाबरला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाघाने कमलेशवर हल्ला केला. यात वाघाच्या पंजामुळे कमलेशला दुखापत झाली. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचा आधार घेतला. तो झाडावर चढला. वाघ खाली असल्याने तो रात्रभर झाडाला चिकटून राहिला.

रात्री अंधारात त्याला काहीच दिसत नव्हते. एवढ्या रात्री त्याला मदत मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे तो रात्रभर झाडावर बसून राहिला. बचावासाठी कोणीतरी येईल, अशी आशा त्याला होती. तो जीव मुठीत धरून झाडावरच बसला होता.

उजाडल्यानंतर गावकऱ्यांनी कमलेशला शोधून काढले. त्याला झाडावरून खाली उतरवले. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमलेश सिंग रुग्णालयात असताना त्याने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. वाघाच्या पंजामुळे त्याच्या मांडीला दुखापत झाल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT