देश विदेश

Crime News: लग्न झालेल्या गर्लफ्रेंडची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या, मृतदेहासोबत दोन दिवस झोपला

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात विवाहित पुरुषाने माजी प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरला. लग्नाचा दबाव सहन न झाल्याने गुन्हा केला आणि नंतर पोलिस कोठडीतून पळून गेला.

Dhanshri Shintre

निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात एका अवैध प्रेमसंबंधातून आलेल्या क्रूर हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विवाहित प्रेयसीने लग्नासाठी वारंवार दबाव आणल्यानंतर आरोपीने तिला निर्दयीपणे ठार मारून मृतदेह स्वतःच्या घरात पुरला. ही घटना ओरछा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून आरोपीचा तपास आणि शोध अद्याप सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रतिराम राजूपतचा लग्नापूर्वीच एका विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होता. जो लग्नानंतरही सुरु राहिला. या दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते. मात्र, महिलेने आपल्या पतीला सोडून रतीरामशी लग्न करण्याचा निर्णय घेत वारंवार दबाव टाकू लागल्याने आरोपी अस्वस्थ झाला. तणाव वाढत गेल्यानंतर रतीरामने आपल्या मित्रांसह तिच्या हत्येचा कट रचला.

२ ऑक्टोबरच्या रात्री, आरोपीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावले. कारण तो त्या दिवशी एकटा होता. रात्री दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध झाले. पण त्याचवेळी रतीरामने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंह यांच्या मदतीने घराच्या मातीच्या फरश्याखाली खोल खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला. पुरलेल्या जागेला माती आणि शेणाने लेपून सामान्य स्थितीत आणले गेले, त्यावर पलंग टाकण्यात आला आणि आरोपी दोन दिवस त्याच ठिकाणी झोपत राहिला.

महिलेच्या बेपत्ता होण्याने तिच्या कुटुंबाचा संशय वाढला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे रतीरामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक डॉ. रायसिंह नरवारिया यांनी सांगितले की, आरोपीने बलात्कार करून निर्दयीपणे हत्या केली आणि मृतदेह घरात पुरला. मात्र, आरोपी पोलिस कोठडीत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने ठाण्यातून फरार झाला. निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, सध्या फरार आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

शरीरात 'हे' बदल दिसले तर दुर्लक्ष करू नका; असू शकतात गंभीर आजार

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT