Surabhi Jayashree Jagdish
शरीर देत असलेले हे संकेत वेळेवर ओळखले गेले, तर आजार गंभीर होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येतं. म्हणूनच हे सिग्नल ओळखणे आणि योग्य वेळी पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
त्वचेवर पांढरे डाग दिसू लागणे हे शरीरात व्हिटॅमिन B12 ची गंभीर कमतरता असल्याचे संकेत असू शकतात. काहीवेळा हे लक्षण ऑटोइम्यून आजारांशीही संबंधित असते.
झोपताना पायांमध्ये जळजळ, झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवणं हे धोकादायक संकेत असू शकतात. हे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळते आणि नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झाल्याचं दर्शवतं.
तोंडातून सतत दुर्गंध येत राहणे हे फक्त ओरल हायजीनशी संबंधित नसते. हे आतड्यांच्या आरोग्यात बिघाड, अपचन, अॅसिड रिफ्लक्स किंवा यकृताच्या समस्यांमुळेही होऊ शकते.
हात-पाय सतत थंड राहणं हे शरीरात रक्ताभिसरण नीट न होणं दर्शवतं. काही वेळा हे थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बिघाडामुळेही होतं.
जर अचानक खूप मीठ किंवा खारट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा वाटू लागली, तर याकडे दुर्लक्ष करू नये. हे शरीरात खनिजांची कमतरता किंवा अॅड्रिनल फटीगचे लक्षण असू शकते.
डोळा सतत फडफडणं हे मॅग्नेशियमच्या कमतरतेशी संबंधित असू शकते. काही वेळा अपुरी झोप किंवा नर्व्ह सिस्टीमवरील ताणामुळेही असं लक्षण दिसतं.