Russo Ukrainian War: अन हंगेरीत घुमल्या भारत माता की जय घोषणा...(पहा Video) Saam TV
देश विदेश

Russo Ukrainian War: अन हंगेरीत घुमल्या भारत माता की जय घोषणा...(पहा Video)

यूक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यावर युक्रेन मधील परिस्थिती खूपच चिंताजनक झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: यूक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यावर (attack) युक्रेन मधील परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. त्यामध्ये अडकलेल्या भारतीयांची (Indians) तर चिंता अधिकच वाढली आहे. आतापर्यंत अनेक भारतीयांना युक्रेनमधून (Ukraine) बाहेर काढण्यात आले आहे. ते विशेष विमानाने भारतात परतले आहेत. अशीच एक फ्लाइट टेक ऑफ करण्याअगोदर पायलट (Pilot) असे काही म्हणाला की, ऐकून प्रवासी देखील भावुक झाले आहेत.

पहा व्हिडिओ-

ही घटना स्पाइसजेटच्या विमानात घडली आहे. यावेळी पायलट सर्व प्रवाशांचे स्वागत करण्याकरिता अनाऊन्समेंट करत होता. हे उड्डाण बुडापेस्टहून नवी दिल्लीच्या (New Delhi) दिशेने सुरू होणार होते. विमान भारतीय प्रवाशांनी खचाखच भरले होते. हा व्हिडीओ (Video) स्पाइसजेटच्या (SpiceJet) ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन (Twitter) शेयर करण्यात आले आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडीओत पायलट विमानामधील सर्व भारतीयांचे स्वागत करत असताना दिसत आहे.

तुम्ही सर्वजणं सुरक्षित असल्याचा आनंद आहे. आणि तुमचे धाडस बघून आम्हाला अभिमान वाटत आहे. इतक्या कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण बाहेर आले आहेत. आणि आता आपल्या घराच्या दिशेने प्रवास करत आहात. तुम्ही आराम करा आणि कुटुंबाला भेटण्याकरिता प्रतीक्षा करा. पायलटने जय हिंद म्हणून आपले आपले म्हणणे पूर्ण केले आहे. यानंतर संपूर्ण विमानामध्ये टाळ्यांचा आवाज झाला. प्रवाशांनी देशभक्तीच्या घोषणा दिल्या. तर काहींनी तर जय श्री रामच्याही घोषणा दिले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT