Bharat bandh on February 12 Saam TV Marathi News
देश विदेश

Bharat Bandh : आज भारत बंद! ६०० जिल्ह्यांवर परिणाम; शाळा ते बँक, काय सुरू, काय बंद? वाचा A टू Z माहिती

Bharat Bandh 2026 what is open and closed today : कामगार संघटनांनी नव्या कामगार कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक दिली आहे. बँका, शाळा, सरकारी कार्यालये आणि वाहतूक सेवांवर काय परिणाम होणार? कोणती सेवा सुरू राहणार? वाचा A टू Z संपूर्ण माहिती.

Namdeo Kumbhar

Bharat Bandh Latest Update : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात आज अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. देशव्यापी संपामुळे (Labour Law Reforms Trigger Nationwide Protest) भारतातील बँकिंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट, शाळा आणि सरकारी कार्यालयावर परिणाम होणार आहेत. भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे, पण आज काय सुरू? काय बंद असेल? याबाबत जाणून घेऊयात...(February 12 Bharat Bandh: What's likely to be open and closed)

महाराष्ट्रात कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक, भारतीय कामगार सेना, आयटक, एचएमएस, सीटीयू, एनटीयूआय,एआयसीसीटीयू, एआयआयईए, एआयबीईए, बीईएफआय, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, कामगार एकता, श्रमिक एकता मंच, स्वतंत्र फेडरेशनसह महाराष्ट्रातील २०हून अधिक संघटनांनी (Maharashtra strike news today) भारत बंदला पाठिंबा दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील ३० कोटींहून अधिक कामगार या संपात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांच्या मते, या संपाचा परिणाम ६०० हून अधिक जिल्ह्यांमधील कामकाजावर होईल. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान सुमारे ५५० जिल्ह्यांपेक्षा जास्त ठिकाणी परिणाम झाला होता.(Bharat bandh on February 12: Banks, transport, offices - what will be open and what will shut during nationwide strike)

भारत बंद का ? नेमकं कारण काय आहे? Why is Bharat Bandh called today?

केंद्र सरकारने २०२५ मध्ये कामगार कायद्यात मोठे बदल केले आहेत. कामगारांचे २९ कायदे रद्द करत केंद्र सरकारने ४ नवीन (New labour laws 2025 India) कायदे आणले. या नव्या कामगार कायद्यांचा देशभरातली १० कामगार संघटनांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळेच भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातील २० हून अधिक संघटनांनी पाठिंबा दिलाय. नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांचे भविष्यच अंधारात आणल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. नव्या कायद्यामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कधीही कामावरून काढू शकतात. या नव्या कायद्याविरोधात देशभरातील संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांनी आज बंद पुकारलाय.

भारत बंदमुळे कोणत्या गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे? Bharat bandh on February 12 - What's likely to be affected:

अनेक राज्यांमध्ये बस आणि ऑटो संघटनांच्या संपामुळे प्रवास कठीण होऊ शकतो.

संपामुळे प्रभावित झालेल्या भागात, कमी कर्मचारी सरकारी कार्यालयांमध्ये येऊ शकतात.

अनेक व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद राहू शकतात.

सुरक्षेच्या दृष्टीने, अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कोणती ठिकाणे खुली राहण्याची शक्यता आहे? Bharat bandh on February 12 - What's Likely to remain open:

सर्व आपत्कालीन आरोग्य सेवा सुरळीतपणे चालतील.

रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागाच्या सेवा बंद केल्या जाणार नाहीत.

या बंदचा हवाई प्रवासावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

बँक शाखा बंद असतील, परंतु डिजिटल व्यवहार आणि एटीएम सुरू राहतील.

बँका बंद असतील का? Are banks closed during Bharat Bandh?

भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे, अनेक संघटनांनी याला पाठिंबा दिलेला आहे. पण बँकांनी अथवा रिझर्व्ह बँकेने या दिवशी सुट्टी जाहीर केलेली नाही. म्हणजेच, देशातील सर्व बँका सुरू राहतील. काही कर्मचारी संपात सहभागी झालेले असतील त्यामुळे ग्राहकांना बँक शाखांमध्ये सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा चालू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी?

Success Story: वडील मजुरी करायचे, आई भाजी विकायची, सोलापूरचा लेक IPS झाला, २० लाखांची नोकरी सोडून UPSC केली क्रॅक

पायलटने 'जाणूनबुजून इंधन स्विच बंद केलं'? एअर इंडिया विमान अपघाताप्रकरणी इटालियन वृत्तपत्राचा मोठा दावा

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

SCROLL FOR NEXT