Punjab Elections Update भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री - Saam Tv
देश विदेश

भगवंत मान पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री होणार, भगत सिंग यांच्या गावी घेणार शपथ

दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही आम आदमी पक्षाने कोणत्याही राज्यातील व्हीव्हीआयपींना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेले नाही.

वृत्तसंस्था

पंजाब - आम आदमी पार्टीचे (AAP) नवनिर्वाचित आमदार भगवंत मान (Bhagwat Maan) हे 16 मार्च रोजी म्हणजेच आज दुपारी 12.30 वाजता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथ घेण्यासाठी त्यांनी होशियारपूर जिल्ह्यातील शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे मूळ गाव खटकड़ कलां निवडले आहे. दिल्लीप्रमाणेच (Delhi) पंजाबमध्येही (Punjab) आम आदमी पक्षाने कोणत्याही राज्यातील व्हीव्हीआयपींना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेले नाही. त्याचवेळी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित शपथविधीसाठी खटकड़ कलां येथे पोहोचले आहेत.

हे देखील पहा -

भगवंत मान यांनी त्यांच्या शपथविधीसाठी ड्रेस कोड जाहीर केला आहे. यामध्ये पुरुषांनी पिवळा फेटा आणि महिलांनी पिवळी शाल/स्टोल परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकंच नाही तर कार्यक्रमस्थळाचा पंडालही पिवळ्या रंगाने सजवण्यात आला आहे. या सोहळ्यात एक लाखाहून अधिक लोक जमण्याची शक्यता आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये AAP ला प्रचंड बहुमत मिळाले. एकूण 117 जागांपैकी 92 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या. दुसरीकडे काँग्रेसला 18, भाजपला 2, अकाली दलाला 4 आणि इतरांना एक जागा मिळाली. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान झाले होते, ज्याचा निकाल १० मार्चला जाहीर झाला. धुरी मतदारसंघातून भगवंत मान 58 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

SCROLL FOR NEXT