Berlin allows women to swim topless in swimming pools
Berlin allows women to swim topless in swimming pools SAAM TV
देश विदेश

Topless Swimming : अजबच! बर्लिनमध्ये महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होऊन आंघोळ करण्यास परवानगी

Chandrakant Jagtap

Berlin News : तुम्ही अनेकदा स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) आंघोळ करण्याचा आनंद घेतला असेल. स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसोबतच काही लोक इतर खेळही खेळतात. रिलॅक्स होण्यासाठी तो एक उत्तम पर्याय मानला जातो. आता तर स्विमिंग पूलसह सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणीच घर घेण्याकडे लोकांचा कल आहे. परंतु आता या स्विमिंग पूलविषयी एक विचित्र बातमी समोर आली आहे.

सामान्यतः स्विमिंग पूलमध्ये महिला आणि पुरुष दोघांना एकत्र आंघोळ करण्याची परवानगी असली तरी कपड्यांशिवाय कोणालाही आंघोळ करण्याची परवानगी नसते. परंतु आता जर्मनीची राजधानी बर्लिन याला अपवाद ठरणार आहे.

कारण येथे महिलांना टॉपलेस होऊन स्विमिंग (Topless swimming) पूलमध्ये आंघोळ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, बर्लिन सरकारने (Berlin Government) गुरुवारीच बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची परवानगी देण्याबातची घोषणा केली आहे. (Viral News)

एका महिलेने स्विमिंग पूलमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बर्लिन सरकारने हा अतिशय विचित्र निर्णय घेतला आहे. बर्लिन सिनेट फॉर जस्टिस, डायव्हर्सिटी अँड अँटी एंटी-डिस्क्रिमिनेशनने म्हटले की, या महिलेने सिनेटच्या लोकपाल कार्यालयात समान वागणूक मागितली आणि महिलांना पुरुषांप्रमाणे टॉपलेस पोहण्याची परवानगी द्यावी असे सांगितले.

सिनेटने सांगितले की, शहराचे सार्वजनिक पूल चालवणाऱ्या बर्लिनर बॅडरबेटरीबेने कपड्यांबाबतचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी लोकपाल प्रमुख डोरिस लीबशर यांनी सांगितले की 'लोकपाल कार्यालय बॅडरबेटरीबेच्या निर्णयाचे स्वागत करते. कारण पुरुष असो किंवा महिला ते सर्व बर्लिनवासीयांसाठी समान अधिकार स्थापित करते. (Latest Marathi News)

रिपोर्टनुसार पूर्वी बर्लिनमधील महिलांनी अर्धनग्न आंघोळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना एकतर स्वत: ला झाकण्याचा सल्ला देण्यात आला किंवा त्यांना स्विमिंग पूल सोडण्यास सांगितले गेले. काहीवेळा तर तेथे परत येण्यास देखील त्यांना बंदी घालण्यात येत होती. परंतु आता आता येथे महिलांना टॉपलेस आंघोळ करता येणार आहे. बर्लिनमध्ये टॉपलेस आंघोळीचा हा नवा नियम कधीपासून लागू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT