Hasan Mushrif News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावून मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर मुश्रीफ 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणात माझा काही संबंध नाही, ईडीसमोर बाजू मांडू आणि त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करून असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मला ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यासाठी ते समन्स बजावण्यासाठी घरी गेले होते. मी दोन दिवस बाहेर असल्यामुळे आणि एकंदरीत कुटूंबियांची झालेली अवस्थेमुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, त्यांना आधार देण्यासाठी आलो आहे. आज मी माझ्या वकिलांना ईडी कार्यालयात मुदत घ्यायला सांगितली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच ते म्हणाले, आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. जवजवळ चार लाख लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. इतरही महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे एक महिना मुदत मिळावी अशी विनंती माझे वकील करणार आहेत आणि बाकी सर्वांबाबतचे तपशील मी आपल्याला देईल. (Latest Marathi News)
मुश्रीफ म्हणाले की, ईडीची आजपर्यंत मला नोटीस नव्हती, आता ते समन्स देऊन गेले आहेत. आधी त्या केसमध्ये माझं नाव नव्हत, आता त्या केसमध्ये ते मला समन्स देऊन गेले आहेत. वास्तविक त्यात माझा काही संबंध नाही. परंतु त्यांना उत्तर देताना आपण काय ते सांगू आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू असे मुश्रीफ म्हणाले आहेत. (Latest Political News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.