Bengaluru Shocking news Saam Tv
देश विदेश

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Bengaluru Shocking News: सॉफ्टवेअर इंजिनीअरने लग्नाला ३ वर्षे झाली तरी मुल होत नसल्यामुळे शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या. यामुळे या तरुणाच्या प्रकृतीत बिघाड झाला. एका व्यक्तीने या गोळ्या आणि सल्ला देण्यासाठी त्याची तब्बल ४८ लाखांची फसवणूक केली.

Priya More

Summary -

  • लैंगिक समस्या दूर करण्याच्या नावाखाली २९ वर्षीय इंजिनिअरची फसवणूक

  • तब्बल ४८ लाखांचा गंडा घातला

  • औषध बंद केल्यास नुकसान होईल अशी धमकी देऊन आणखी पैसे उकळले

  • तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी फरार

  • पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू

बंगळुरूमध्ये २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची तब्बल ४८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. लैंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा तरुण एका आयुर्वेदिक औषधं देणाऱ्या व्यक्तीकडे गेला. या व्यक्तीने त्याला शक्तीवर्धक औषधं देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुना लावला. या व्यक्तीने या तरुणाला महागडे आणि हानिकारक हर्बल प्रोडक्ट्स विकले. औषधं खाल्ल्यानंतर या तरुणाची प्रकृती खराब झाली आणि त्याला किडनीचा त्रास होऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने पोलिस ठाण्यात घेत तक्रार दाखल केली.

या तरुणाने तक्रारीमध्ये सांगितले की, तो गेल्या ३ वर्षांपासून एका खासगी कंपनीत काम करतो. तो ज्ञानभारती परिसरात राहतो. तो मूळचा शिवमोगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे मार्च २०२३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्याला लैंगिक समस्या येऊ लागल्या. त्याने केंगरी येथील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. जिथे डॉक्टरांनी त्यच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि औषधे लिहून दिली.

या वर्षी ३ मे रोजी हॉस्पिटलमध्ये जात असताना त्याला उल्लाल येथील लॉ कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला एक आयुर्वेदिक तंबू दिसला. तेथील पोस्टर्सवर लैंगिक समस्यांवर त्वरित उपायांचा दावा करण्यात आला होता. ते वाचून हा तरुण तंबूत गेला आणि त्याला त्यामध्ये एक पुरूष दिसला. तरुणाने त्याला त्याच्या समस्या सांगितल्या. त्या व्यक्तीने तरुणाला सल्ला दिला की विजय गुरूजी यावर लवकर उपचार करतील. त्याने तरुणाची भेट विजयसोबत करून दिली.

त्याच संध्याकाळी एक व्यक्ती आयुर्वेदिक तंबूत आला आणि त्याने स्वतःची ओळख विजय गुरुजी अशी करून दिली. तरुणाची तपासणी करून त्याला देवराज बुटी नावाचे औषध दिले. हे औषध हरिद्वार येथून आणल्याचे त्याने तरुणाला सांगितले. या औषधाची किंमत प्रति ग्रॅम १.६ लाख रुपये असल्याचे तरुणाला सांगण्यात आले. त्यानंतर तरुणाला भावना बुटी तेल नावाचे औषध लिहून देण्यात आले. ज्याची किंमत प्रति ग्रॅम ७६,००० रुपये होते. त्यानंतर त्याला दुसरे औषध देवराज रसबुती देण्यात आले ज्याची किंमत प्रति ग्रॅम २.६ लाख रुपये होते. त्या तरुणाने या औषधांवर लाखो रुपये खर्च केले. काही त्याच्या पत्नी आणि कुटुंबाकडून, काही बँकेच्या कर्जातून आणि काही मित्रांकडून पैसे घेऊन तो हे उपचार घेत होता.

मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही त्या तरुणाला काहीच फरक पडला नाही. वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की कथित औषधांमुळे त्याच्या किडनी खराब झाल्या आहेत. जेव्हा त्याने याबद्दल गुरूंना विचारले तेव्हा त्याने औषध घेणे बंद केल्यास मोठे नुकसान होईल अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांचा शोध सुरू आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनावट आणि फार्मसी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

SCROLL FOR NEXT