Rapido Bike Driver Video  x
देश विदेश

Rapido Bike Driver : बाईक इतकी फास्ट का चालतोयस? महिला प्रवाशाच्या प्रश्नांमुळे रॅपिडोचालकाचा संताप, जोरात कानशिलात लगावली अन्...

Bengaluru News : एका रॅपिडो बाईकचालकाने महिला प्रवासीच्या कानशिलात लगावल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Viral Video : बंगळुरूमध्ये एका रॅपिडो बाईकस्वाराने एका महिलेला कानाशिलात लगावली. हा बाईकस्वार बेदकारपणे बाईक चालवत होता, त्याने ट्रॅफिक सिग्नल देखील तोडला होता. यावरुन महिलेवर बाईकस्वाराने हल्ला केला. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार बंगळुरूच्या जयनगर या परिसरात घडला आहे. पीडित महिलेने प्रवासादरम्यान बाईकचालकाच्या धोकादायक वर्तनावर प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन त्या दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. रस्त्यावर भांडत असताना रॅपिडो बाईकस्वाराने जोरात महिलेच्या कानशिलात लगावली.

शुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पीडित महिला आणि रॅपिडो बाईकस्वार रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसते. काही सेकंदांनंतर बाईकस्वार महिलेच्या जोरात कानशिलात लगावतो. फटका इतका जोरात बसतो की महिला रस्त्यावर खाली पडते. घटनेदरम्यान आसपास लोकांची गर्दी झाल्याचेही व्हिडीओत दिसते.

पीडित महिला सुरुवातीला पोलिसांशी संपर्क करण्यास टाळाटाळ करत होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेला तक्रार दाखल करण्यास राजी केले. या प्रकरणात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आल्यानंतर एफआयआर श्रेणीसुधारित करण्याचा विचार करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT